विशेष

सदाशिवनगरच्या जिल्हा बँक चोरी प्रकरणातील 13 आरोपींना अटक एकूण 6,42,770 रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची ‘धडाकेबाज’ कामगिरी

महर्षि डिजीटल न्यूज

सोलापूर : सदाशिवनगर येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बॅंकेचे लाॅकर तोडून 51,16,447 रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या 13 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची ‘धडाकेबाज’ कामगिरी बजावली आहे.

याबाबत सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण जिल्हयातील माळशिरस पोलीस ठाणे गुरनं 388/2023 भादवि कलम 380, 454, 457, 34 प्रमाणे दिनांक 18/07/2023 रोजी गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांनी माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सदाशिवनगर, माळशिरस या बॅंकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बॅंकेचे लाॅकर तोडून 51,16,447 रू. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

 सदर गुन्हयाची पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी गंभीर दखल घेवून घटनास्थळास भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके तयार करून त्यांनी गुन्हयातील आरोपीतांची माहिती प्राप्त केली. गॅस कटरच्या सहाय्याने भिंत फोडून बॅंकेत चोरी करणयाची पध्दत झारखंड येथील आरोपी ठिकठिकाणी वापरतात असे तपासात लक्षात आले होते. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा देखील झारखंड येथील आरोपीतांनी केला असल्याचे समजले. 

 त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक शैलेष खेडकर यांच्या पथकाने झारखंड राज्यातील साहेबगंज व पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातून 02 आरोपींना ताब्यात घेतले होते. उर्वरित आरोपी हे नेपाळ, बांगलादेश मध्ये पळून गेल्यामुळे मिळून येत नव्हते.

 दिनांक 10/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे यांना गोपनीय बातमी मिळाली की, झारखंड व नेपाळ येथील आरोपी हे लातूर येथील बॅंकेवर दरोडा टाकण्याकरीता येणार आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि शशिकांत शेळके व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे यांनी सोलापूर तुळजापूर महामार्गावरील मौजे उळे गांवच्या हद्दीत सापळा रचून अत्यंत षिताफीने दरोडयाच्या तयारीत असलेल्या 05 आरोपींना दरोडयाच्या साहित्य व वाहनासह ताब्यात घेतले.सदरबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 617/2023 भादविसंक 399 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात इतर 08 आरोपींचा सहभाग असलेबाबत निश्पन्न झाले. 

       नमूद गुन्हयाचे तपासात सपोनि शशिकांत शेळके यांनी 03 आरोपींना पुणे येथून ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक शैलेष खेडकर यांनी उदगीर लातुर येथून 05 आरोपीतांना ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हयात एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी हे झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्हयातील, पश्चिम बंगाल राज्यातील मालदा जिल्हयातील तसेच नेपाळ या देशातील आहेत. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी देषाच्या विविध भागात गॅस कटरच्या सहाय्याने बॅक फोडीसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. 

 यातील अटक आरोपीतांकडे केलेले कौशल्यपूर्ण तपासात 04 आरोपीतांचा माळशिरस पोलीस ठाणे गुरनं 388/2023 भादविसंक 380, 454, 457, 34 प्रमाणे दाखल गुन्हयात सहभाग निश्पन्न झाला असून त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. तसेच यातील आरोपी हे वाकड, पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय गुरनं 651/2023 भादविसंक 395, 398,307 इत्यादी सह आर्म अॅक्ट 4,25 व तेलंगना राज्यातील सुजातानगर पोलीस ठाणे गुरनं 83/2023 भादविसंक 457, 380 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी आहेत. 

 नमूद गुन्हयातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 16/10/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नमूद गुन्हयाचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण हे करीत आहेत. आरोपीतांचे ताब्यातून दरोडा टाकण्यासाठी व बॅंक फोडण्यासाठी लागणारे मोठे गॅस सिलेंडर, गॅस कटर, मोठे स्क्रु ड्रायव्हर, कटावण्या, लोखंडी काणस, हातोडे, लोखंडी पहार,दोरी, कोयते इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपींनी संपर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील विविध भागात गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शखा, सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे, शशिकांत शेळके, पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सुबोध जमदाडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सफौ ख्वाजा मुजावर, शिवाजी घोळवे, मनोहर माने, श्रीकांत गायकवाड, नारायण गोलेकर,पोलीस हवालदार बापू शिंदे, आबा मुंडे, धनाजी गाडे, प्रकाश कारटकर, सलिम बागवान, मोहन मनसावाले, विजय भरले, रवि माने,पोना धनराज गायकवाड, चालक समीर शेख, पोशि अजय वाघमारे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, दिलीप थोरात, युसुफ पठाण, अन्वर अत्तार, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुभाश हरिश्चंद्र पवार, पोकाॅ सागर साहेबराव ढोरे पाटील यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!