शहर

साडेचार लाख रुपयांची लोखंडी डायची चोरी ; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : जुना बाजार तळ अकलूज येथून साडेचार लाख रुपयांची लोखंडी डायची चोरी झाली असल्याची फिर्याद अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयूर माने रा. नवीन बाजार तळ अकलूज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 09/10/2023 रोजी दुपारी 02/00 वा चे पूर्वी त्यांच्या कारखान्यामधून अल्युमिनीयमच्या कई व कढई बनविण्याची अल्युमिनीयमच्या व लोखंडी डाय असा अंदाजे 450000/- रुपये किमतीचा माल हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीने चोरून नेला आहे. 

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक दिपरततन गायकवाड यांच्या आदेशान्वये गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढिल तपास पोहेकॉ  पोरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!