Latest News

माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीतून 114 उमेदवारांची माघार

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी मोठी घडामोड घडली असून तब्बल 114 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे अनेक गट व गणांमध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गटांमधून 78 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यापैकी 47 उमेदवारांनी माघार घेतली असून 31 उमेदवार अंतिम निवडणूक रिंगणात उरले आहेत.

त्याचप्रमाणे 18 पंचायत समिती गणांमधून 120 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 47 उमेदवारांनी माघार घेतली असून 31 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

जिल्हा परिषद गटनिहाय स्थिती

दहिगाव गट : 4 उमेदवारांनी माघार, 4 रिंगणात

मांडवे गट : 8 माघारी, 3 उमेदवार रिंगणात

फोंडशिरस गट : 7 माघारी, 3 रिंगणात

संग्राम नगर गट : 10 माघारी, 2 उमेदवार रिंगणात

माळीनगर गट : 6 माघारी, 4 उमेदवार रिंगणात

बोरगाव गट : 3 माघारी, 5 उमेदवार रिंगणात

वेळापूर गट : 3 माघारी, 2 उमेदवार रिंगणात

निमगाव गट : 1 माघार, 4 उमेदवार रिंगणात

पिलीव गट : 5 माघारी, 4 उमेदवार रिंगणात

पंचायत समिती गणनिहाय स्थिती

गुरसाळे गण : 8 माघारी, 3 उमेदवार

दहिगाव गण : 2 माघारी, 3 उमेदवार

मांडवे गण : 2 माघारी, 2 उमेदवार

कन्हेर गण : 2 माघारी, 3 उमेदवार

भांबुर्डी गण : 2 माघारी, 2 उमेदवार

फोंडशिरस गण : 3 माघारी, 2 उमेदवार

मेडद गण : 5 माघारी, 3 उमेदवार

संग्राम नगर गण : 2 माघारी, 2 उमेदवार

माळीनगर गण : 3 माघारी, 3 उमेदवार

लवंग गण : 4 माघारी, 3 उमेदवार

जांबुड : 5 माघारी, 3 उमेदवार

बोरगाव गण : 3 माघारी, 2 उमेदवार

वेळापूर गण : 4 माघारी, 6 उमेदवार

यशवंत नगर गण : 4 माघारी, 3 उमेदवार

निमगाव गण : 3 माघारी, 4 उमेदवार

गोरडवाडी गण : 8 माघारी, 4 उमेदवार

पिलीव गण : 6 माघारी, 3 उमेदवार

तांदूळवाडी गण : 1 माघार, 3 उमेदवार

लढतींचे चित्र स्पष्ट

मोठ्या प्रमाणावर उमेदवारी माघारी झाल्यामुळे अनेक गट व गणांमध्ये थेट लढती, तर काही ठिकाणी बहुरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. आता उमेदवार प्रचाराच्या रणांगणात उतरले असून, पुढील काही दिवसांत माळशिरस तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापणार असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!