Latest News

भरत शेठ गोगावले यांच्याकडून बाबासाहेब माने पाटील यांचे विशेष कौतुक ; माने बंधूंकडून गोगावले यांचा सन्मान 

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात 

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी महत्त्वपूर्ण भेट नुकतीच “यशोदा निवास” येथे पार पडली. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी बाबासाहेब माने पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

या प्रसंगी गोरडवाडी पंचायत समिती गणाच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार सौ. रेशमाताई बाबासाहेब माने पाटील यांनी औक्षण करून मंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. नूतन जिल्हा परिषद सदस्य गौतम बाबा माने पाटील व बाबासाहेब माने पाटील यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन मंत्री महोदयांचा सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

मंत्री गोगावले हे मंगळवेढा येथील कार्यक्रमानिमित्त परिसरात आले असताना त्यांनी खास वेळ काढून “यशोदा निवास” येथे भेट दिली. माळशिरस तालुक्यात शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यापैकी गोरडवाडी गणातील रेशमाताई माने पाटील यांच्या उल्लेखनीय विजयाबद्दल विशेष अभिनंदन करण्यासाठीच ही भेट असल्याचे सांगितले जाते.

या भेटीत तालुक्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. गौतम आबा माने व बाबासाहेब माने पाटील यांनी प्रलंबित प्रकल्प, निधीची आवश्यकता आणि स्थानिक पायाभूत सुविधांबाबत मुद्देसूद मांडणी केली. यावर मंत्री गोगावले यांनी आवश्यक त्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बाबासाहेब माने पाटील यांच्या संघटन कौशल्याचे व नेतृत्वगुणांचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. पुढील काळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

“यशोदा निवास” येथे झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरणाला नवी दिशा मिळाल्याची चर्चा असून, स्थानिक विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बाबासाहेब माने पाटील यांच्या पुढाकारामुळे तालुक्यातील प्रश्नांना थेट मंत्रिस्तरावर पाठपुरावा मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!