विशेष

भाजपच्या ग्रामपंचायतीला दिलेला निधी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीला वळवला…; लोकनियुक्त महिला सरपंचाचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या कोळेगाव ग्रामपंचायतीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामविकास खात्याकडून 9.50 लाख रूपायचा निधी दिला होता. मात्र खासदार निंबाळकरांनी जे विकासकाम मंजूर केले होते त्याचे इस्टीमेट होण्यापूर्वीच या संबधित कामाचा निधी काळमवाडी ग्रामपंचायतीकडे देणार आहे. त्यामुळे कोळेगाव येथील कामाचे इस्टीमेट व पुढील कार्यवाही करू नका म्हणून अधिकार्‍यांना सुचना केल्याचे कोळेगाव ग्रामपंचायतीचे भाजपचे लोकनियुक्त महिला सरपंच रजनी प्रसाद दुपडे यांनी आरोप केला.

कोळेगावचे सरपंच रजनी प्रसाद दुपडे म्हणाल्या गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या गावातून 2156 मते देत 1695 मताचे लिड दिले खासदारांनी आम्हाला आज पर्यत एक रूपयाचा देखील दिला नव्हता. कधी नव्हे तो आता खासदारांनी आम्हाला दिलेले निधी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतीला वळवणार असल्याचे समजल्याने याची तक्रार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकलूज येथे येणार आहेत त्यावेळेस यांच्या समक्ष करणार असून खासदार भाजपचे की राष्ट्रवादीचे हे विचारणार असल्याचे सरपंच रजनी प्रसाद दुपडे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूका जशा जवळ येत आहे तसे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपा पासून दूर होऊन राष्ट्रवादीच्या गोटात जात आहेत की काय? भाजप वाढवायचे सोडून खासदार निंबाळकर राष्ट्रवादीलाच खतपाणी देत का देत आहेत असा सवालच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!