Latest News

माळशिरस तालुक्यात 3 लाख 18 हजार 281 मतदार मतदानासाठी सज्ज; 363 मतदान केंद्रांवर होणार मतदान

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : माळशिरस तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 3 लाख 18 हजार 281 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 53 हजार 315 महिला, 1 लाख 64 हजार 950 पुरुष तसेच 16 इतर मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण 363 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मतदानासाठी 363 मतदान यंत्रे वापरण्यात येणार असून, ही यंत्रे दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना केली जाणार आहेत. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना तृतीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.

निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पी.आर.ओ. 363, एफ.पी.ओ. 363, ओ.पी.ओ. 726, शिपाई 363 व झेड कर्मचारी 37 अशा प्रकारे एकूण 1,872 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात असणार आहे.

मतदानानंतर दि. 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता माळशिरस येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रारंभी गट क्रमांक 37 व गण क्रमांक 73 आणि 74 यांची मतमोजणी केली जाणार असून, एका गटातील दोन गणांची व त्यामधील टपाली मतदानाची मोजणी एकाच वेळी पार पडणार आहे. त्यानंतर याच पद्धतीने एकूण नऊ गटांची क्रमाने मतमोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणीसाठी 24 टेबल्स असणार असून, टपाली मतदानासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, दोन सहाय्यक व एक शिपाई अशी रचना असणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण 201 कर्मचारी कार्यरत असतील.

ही माहिती प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली आहे यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!