माळशिरस तालुक्यातील वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांसाठी १०० कोटी निधी मंजूर – आ.राम सातपुते
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल 200 आ. राम सातपुते कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. राम सातपुते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था होती. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आ. राम सातपुते यांनी यामध्ये लक्ष घातले होते. राज्यामध्ये रस्त्यांसाठी सर्वात जास्त निधी हा माळशिरस मतदारसंघासाठी खेचण्यात यशस्वी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मिळाला असल्याची माहिती आ. राम सातपुते यांनी दिली.
आमदार राम सातपुते यांनी रस्त्यांसाठी आणलेल्या या भरघोस निधीमुळे माळशिरस तालुक्यातील रस्त्यांचे चित्र बदलणार आहे. आजपर्यंत तालुक्यात एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निधी मंजूर झाला आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची भावना तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील फळवणी येथे नीरा उजवा कालव्यावरती लहान पूल करणे एक कोटी २५ लाख, खुडूस येते ७७ चौकीवरती लहान पुलाचे बांधकाम करणे ७५ लाख, विजवडी ते सवतगव्हाण रस्ता करणे एक कोटी, एकशिव जाधववाडी फुले वस्ती रस्ता करणे दोन कोटी ४० लाख, झंजेवाडी ते तरंगेखोरा रस्ता करणे ९० लाख, वेळापूर शेरी रस्ता करणे दोन कोटी, फळवणी ते आसवे वस्ती ९० लाख, फोंडशीरस कुचेकर वस्ती ते माणिक बळवंत वाघमोडे वस्ती ५० लाख, पिंपरी येथे पाटील वस्ती ते खडकमळा उंबरदेव ९० लाख, धर्मपुरी चोपडे माने वस्ती ५० लाख, गिरजणी रामोशी वस्ती ५० लाख, बचेरी ते शिखरवस्ती ८० लाख, शिंदेवाडी ते डोंबाळवाडी रस्ता करणे ६० लाख, कोथळे येथील माने वस्ती ७० लाख, सुळेवाडी ते कारखेल ४० लाख, मेडद ते तुपेवसती ७० लाख, तांबवे येथे ८० लाख, दत्तनगर ते चौंडेश्वरवाडी ९० लाख, डोंबाळवाडी भगत वस्ती ६० लाख, लोणंद पोळ वस्ती ते श्रीनाथनगर ५० लाख, डोंबाळवाडी ते कुरबावी ७० लाख, तिरवंडी ते बंदरा रस्ता करणे ४० लाख, कदमवाडी व इंगळे वस्ती गुरसाळे धांडे वस्तीसाठी ५० लाख, गिरझणी परिसरातील महर्षीनगर बागेचीवाडी ग्रीनफिंगर्ससाठी ५० लाख, भांबुर्डी म्हसवड रोड दत्तनगर बंडगर वस्तीसाठी ५० लाख, मुख्य कालवा खडीकर वस्तीसाठी ५० लाख, गारवाड ते सुळके तुकडी रस्त्यासाठी ५० लाख, मंगळवेढा रस्त्यासाठी ५ लाख. शिंगोर्नी ते कदमवाडी 80 लाख, चकोरे जाधव वस्ती खरात वस्ती 50 लाख, बांगडे कातरर मळा 50 लाख, काळमवाडी कोळेगाव 1 कोटी, सावतगव्हाण ते चौरे वस्ती भुजबळ जगताप वस्ती 60 लाख, गिरजणी संग्रामनगर रोड 50 लाख, मार्कडवडी ते मार्कडवाड वस्ती 50 लाख. मेड 3 दशलक्ष, खुडूस ते पानीव ३० लाख, विजोरी राऊत गट ३० लाख, साळमुखवाडी जोड रस्त्यांसाठी 50 लाख, इंचगाव जिल्हा सीमा रस्त्यासाठी 1 कोटी, जिनपुरी शेरेवाडीसाठी 50 लाख, मालोली जाधव शेरे वस्तीसाठी 40 लाख, कोळेगाव ते बचेरी वस्तीसाठी 50 लाख, शेंडेचिंच ते काळे वस्तीसाठी 80 लाख, दसूर पिराची कुरवली रस्त्यासाठी 70 लाख. , उगडेवाडी ते बोरगावसाठी 50 लाख.माळीनगर काळा मारुती 60 लाख, संगम ते इंगळे वस्ती 50 लाख, संगम ग्रामपंचायत संगम पारडेमार्गे बाभूळगाव शिव वस्ती 50 लाख, खुडूस बोरकर वस्ती निमगाव रोड 50 लाख, खंडाळा नागठाणे मगर वस्ती 50 लाख, खंडाळा नागठाणे वस्ती 50 लाख. रस्ता ते निमगाव खंडाळी रस्ता 50 लाख, निमगाव तरंगफळ रस्ता 1 कोटी, हनुमाननगर कचरेवाडी 1 कोटी 50 लाख, ईजीएम 73 ते महामार्ग 213 जिल्हा महामार्ग 1 कोटी 50 लाख, इस्लामपूर मुख्य कालवा पवार वस्ती यादव कोळेकर वस्ती ते मोठे वस्ती 1 कोटी 50 लाख, विजापूर वस्ती 1 कोटी 50 लाख. हनुमान मंदिर यशवंतनगर 40 लाख, 1999.
तिरवंडी येथे ते हजारे वस्ती विजयसिंह मोहिते-पाटीलनगर एक कोटी ४० लाख, हनुमाननगर कचरेवाडी ७० लाख, वाघोली १४४ राष्ट्रीय महामार्ग एक कोटी, मांडवे कन्हेर मांडकी जळवावी रोड पाच कोटी, महाड पंढरपूर रस्ता ते मांडवी गिरवी सोळ मळा दोन कोटी ५० लाख, राष्ट्रीय महामार्ग १४४ टेळे वस्ती एक कोटी २० लाख, मांडवे जगताप वस्ती एक कोटी ८० लाख, मांडवे सालगुडे वस्ती ९० लाख, यशवंतनगर गिरजणी पाणीव निकमवाडी तरंगफळ गारवड १२ कोटी, वेळापूर घुमेरा वड्यावर पूल बांधणे पाच कोटी, पिलीव येथील शासकीय विश्रामगृहासाठी तीन कोटी ६० लाख, बांगार्ड फॉडशिरस सदाशिवनगर फडतरी खुटबावी रोड ६० लाख, धर्मपुरी शिंदे वस्ती रस्ता सहा कोटी, कोथळे कारुंडे रस्ता चार कोटी ३५ लाख, चांदापुरी कुसमोड मळोली रस्ता तीन कोटी, निमगाव मळोली दोषन कोटी ५० लाख, गोरडवाडी माणिक दुकानदार वस्ती ते जिल्हा सरहद्द दोन कोटी आदी मार्गाना मंजुरी मिळाली आहे.