आ.उत्तम जानकर यांच्या नेतृत्वात विकासाच्या दिशेने मजबूत पाऊल ; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत उंबरे (दहीगाव) व तिरवंडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून आणि स्थानिक विकास निधी (आमदार निधी)तून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे नुकतेच थाटात भूमिपूजन करण्यात आले. उंबरे (दहिगाव) व तिरवंडी या गावांमध्ये झालेल्या या कार्यक्रमांनी स्थानिक पातळीवर विकासाचे नवे पर्व सुरू झाले असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
उंबरे (दहिगाव) येथील कुंभार वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता (7 लाख रुपये) व बोडरे वस्ती येथे सिमेंट काँक्रीट रस्ता (8 लाख रुपये) या दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच तुकाराम भाऊ देशमुख, माजी सदस्य गौतम आबा माने, पांडुरंग तात्या वाघमोडे, युवराज झंजे, राहुल वाघमोडे, उंबरे दहीगावचे माजी सरपंच विष्णुपंत नारनवर, तसेच गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे संचालक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, तिरवंडी येथील बुद्ध वस्तीतील गणपती मंदिरासमोर सभामंडप बांधकामाचे भूमिपूजनही आमदार जानकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमालाही वरील मान्यवरांसह डॉ. मारुती पाटील, रामदास देशमुख, माजी नगरसेवक मारुती देशमुख, रामभाऊ कचरे, तिरवंडीचे सरपंच नानासाहेब वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य शामराव बंडगर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गावातील ज्येष्ठ नागरिक, सोसायट्यांचे संचालक आणि ग्रामस्थ यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या दोन्ही कार्यक्रमांतून माळशिरस मतदारसंघात आमदार जानकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पातळीवर मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकासास चालना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमांमुळे ग्रामपातळीवर विकासाचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.