भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने अकलूजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासन मान्यता प्राप्त भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज यांच्या वतीने शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढी, अकलूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराचे उद्घाटन किशोर घोडके (४९ व्या वेळेचे रक्तदाते) आणि प्रमोद इनामदार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी किशोर घोडके म्हणाले,
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. प्रत्येक पात्र व्यक्तीने वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.”
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रमोद इनामदार, करणराज घोडके, सीए नितीन कुदळे, श्रीमंत बर्वे, ज्ञानदीप जवंजाळ, आर्यन नागरगोजे, विजय शिंदे, सुरज साबळे, सुरज साळुंखे, करण खंडागळे, यश कदम, दर्शन उपाध्ये, अंकुश घुगे, योगीराज खुडे, सुरज दगडे, अभिजीत गायकवाड, आकाश मोरे, नागनाथ गोरड, वैभव देवकते, रोहित चव्हाण, ऋत्विक खंडागळे, विकास जाधव, ऋषीराज शिंदे, जय थोरात, अतुल थोरात, सौ. मंदा घोडके, काजल वळकुंडे, तृप्ती गायकवाड आणि प्रियांका चव्हाण यांचा समावेश होता.
शिबिरात शंकरराव मोहिते पाटील रक्तपेढीचे इंचार्ज डॉ. संतोष खडतरे आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच, रक्तपेढीतील काळे सिस्टर, अनिल लोखंडे आणि त्यांच्या सहकारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला अशोक साळुंखे, उमाजी भोसले, ओंकार भांडवले, सयाजी गायकवाड, शुभम बनपट्टे, ओंकार गोंदकर, विक्रम घोडके, दिलीप उकिरडे सर आणि इन्नुस मुलाणी सर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.