शहर

अकलूज येथे सृजनरंग महोत्सव २०२५ उत्साहात संपन्न ; ३९७ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग 

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे “सृजनरंग महोत्सव २०२५” उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील आणि अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात बॉक्स विकेट क्रिकेट (मुले व मुली), व्हिडिओ रील मेकिंग, मोबाईल फोटोग्राफी, मेहेंदी, वक्तृत्व, निबंध, पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३९७ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवप्रसाद टिळेकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. हनुमंत अवताडे, डॉ. सतीश देवकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पारितोषिक वितरण वाचन महोत्सव समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. प्रा. विनायक माने यांना उत्कृष्ट संघव्यवस्थापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पर्धांचे निकाल

बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा (मुले)

  • प्रथम क्रमांक – बी.एस्सी भाग २
  • द्वितीय क्रमांक – बी.कॉम भाग ३ बी टीम
  • तृतीय क्रमांक – एफ.वाय. बी.कॉम टीम बी आणि एस.वाय. बी.कॉम टीम ए

बॉक्स विकेट क्रिकेट स्पर्धा (मुली)

  • प्रथम क्रमांक – बी.ए. भाग २
  • द्वितीय क्रमांक – टी.वाय. बी.ए.
  • तृतीय क्रमांक – टी.वाय. बी.एस्सी आणि एफ.वाय. बी.कॉम

इतर स्पर्धांचे निकाल

  • पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा – श्रावणी ढगे (प्रथम)
  • प्रोजेक्ट सादरीकरण – रुक्मिणी येल्गोंडे (प्रथम)
  • मेहेंदी स्पर्धा – साक्षी सावंत (प्रथम)
  • वक्तृत्व स्पर्धा – हितेश पुंज (प्रथम)
  • निबंध स्पर्धा – वैष्णवी शिंदे (प्रथम)
  • मोबाईल फोटोग्राफी – सानिया शेख (प्रथम)
  • रील मेकिंग – अलोक गौंडे (प्रथम)

सर्वसाधारण विजेतेपद

  • वर्गनिहाय विजेतेपद – बी.एस्सी भाग ३
  • विभागनिहाय विजेतेपद – बी.कॉम

उपस्थित मान्यवर आणि आभार प्रदर्शन

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी संघटनांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण समारंभाचे आभार डॉ. निवृत्ती लोखंडे यांनी मानले.

सृजनरंग महोत्सव २०२५ मध्ये विद्यार्थ्यांनी आपली कला, कल्पकता आणि बौद्धिक क्षमता यांचे प्रभावी प्रदर्शन घडवले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यातील विविध गुणांना चालना मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!