हस्तगत करण्यात आलेले दोन लाखाचे सोन्याचे दागिने व चार लाखाचे मोबाईल संबंधिताकडे सुपूर्त ; महाराष्ट्र पोलीस रेजींग डे निमित्ताने नातेपुते पोलिसांची कामगिरी
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
नातेपुते : नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेले दोन लाखाचे सोन्याचे दागिने व चार लाख 16 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल नातेपुते पोलिसांनी मोठ्या दिमाखात संबंधिताकडे सुपूर्त केले.
महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे सप्ताहाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांच्या टीमने सदरची दमदार कामगिरी केली आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हददीत दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्राो ०२:०० वा ते ०३:४५ वा चे दरम्यान सुभाष नरहरी केंजळे वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा केंजळेवरती धर्मपुरी ता माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहते घर फोडुन घरफोडी झाली होती. त्यानुसार नातेपुते पोलीस ठाणे येथे २५३/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने नातेपुते पोलीस ठाणे हे करीत होते. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळवुन सदर गुन्हा करणारे वेगवेगळे आरोपीना नातेपुते पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी विक्रांत डिगे, पोलीस उपनिरीक्षक व पोहकों राहुल रणनवरे, पोहेकॉ नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे, पोना राकेश लोहार, पोकों नवनाथ चव्हाण यांनी आरोपीनामे देवगण बापु उर्फ विजय पवार रा आटपाडी सांगली यास अटक करून त्यांचेकडुन वरिल गुन्हयातील २,००,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले होते.
सदरचे सोने फिर्यादीस देणेबाबत श्री. यु बी पेठे मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्यायालय यांचे आदेश झाल्याने तसेच नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले वेगवेगळया कंपणीचे मोबाईल पोकों रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे, पोकॉ रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक विश्लेशन करुन सुमारे ४,१६,०००/-रु किंमतीचे वेगवेगळया कंपणीचे २० मोबाईल हस्तगत केले असुन वरिल एकुण ६,१६,०००/- रु किंमतीची मुददेमाला “महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह” चे औचित्य साधुन वरिल मुददेमाल नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपूर्वक वरिल सर्व गुन्हयातील फित्रा यांना बोलावुन घेवुन त्यांना सोन्याचे दागिणे व मोबाईल परत करण्यात आले.
यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे महारुद्र परजने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ महादेव कदम, पोना राकेश लोहार, पोकॉ रणजित मदने, पोकॉ दिनेश रणनवरे, पोकॉ नितीन पन्नासे, पोकॉ अमोल बंदुके, पोकॉ सोमनाथ मोहिते, पोकों रमेश बोराटे, पोकों गणेश कुलकर्णी, पोकॉ रमेश कर्चे, पोकॉ अमोल देशमुख, पोकों नवनाथ थिटे, मपोकों नेहा बोंदर यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत आहे.