शहर

कॅनलच्या कडेला अवैध दारू विक्री करणाऱ्या वाघोलीच्या इसमावर दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्युज

अकलूज : वाघोली पिंपळवाडी मोठ्या कॅनल लगत अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर पोलीस कॉन्स्टेबल नितीन लोखंडे यांच्या फिर्यादीवरून दारूबंदी अधिनियम अंतर्गत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 28/12/2023 रोजी रात्री ८.०० वा. चे सुमारास औदुंबर महाविर मिसाळ रा. वाघोली ता. माळशिरस हा व्यक्ती वाघोली पिंपळवाडी मोठे कॅनल लगत टपरीचे बाजूस आडोशाला आपल्या कब्जात मानवी जिवीतास हानीकारक सुमारे 1) 1500/- रू. आंबट उग्र घाण वासाचे सुमारे 15 लीटर रसायन बॅरलसह किं. अं. 2)791/-श्रीपूर डॉक्टर कंपनीच्या 07 दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत 113 रु 180 मिलीच्या बाटल्या कि.अं.3) 1190/- देशी दारू सखुसंत्रा कंपनीच्या 08 दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत 70 प्रत्येकी 180 मिलीच्या बाटल्या कि.रू. 4) 285/- रॉयल चॅलेंज कंपनीच्या 03 दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत 95 रु प्रत्येकी 90 मिली कि.अं. 5) 750/- देशी दारू गोल्डी कंपनीच्या 15 दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत 50 रु प्रत्येकी 180 मिलीच्या बाटल्या कि.रू. चा माल विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत नितीन लोखंडे यांना मिळुन आली.

यावरून लोखंडे यांनी फिर्याद देऊन भा द वि सं क 328 व महा. दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!