बहुप्रतिक्षित माळशिरस-पिलीव रोडचे काम वेगात सुरू ; परिसरातील नागरिकात समाधान

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : गेल्या अनेक दिवसापासून माळशिरस पिलीव रोड चे काम सुरू करण्याची प्रतीक्षा या भागातील लोकांना होती नुकतेच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ पार पडला. त्यानंतर रस्त्याच्या कामाला गती येऊन चांगल्या क्वालिटीचे काम होत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. काम सुरू झाल्यापासून चार शिडी वर्क पूर्ण झाले माळशिरस येथील ओढ्यावरील प्रोटेक्शन ऑल चे काम फास्ट सुरू आहे. तरंगफळ येथील साखळी क्रमांक 9 500 ला असलेला चढ कटिंग करण्यात आला. साखळी क्रमांक सहा नऊशे तसेच आठ दोनशे तसेच नऊ झिरो तसेच बारा सातशे मधील भरावा भरून काम पूर्ण केले. असल्याने ऊस वाहतुकीला यापुढे कसलीही अडचण येणार नाही
खराब असलेल्या रोडवरील खडीकरण दोन किलोमीटर पूर्ण झाले आहे. प्रत्येक ठिकाणी पुलाची उंची वाढविल्यामुळे वाहतूक सोपी होणार आहे. चांदापुरी येथील पूल पूर्ण होऊन तेथील वाहतूक ही सुरळीत झाली आहे त्या ठिकाणचा चढ कटिंग करण्यात आला आहे.
माळशिरस पिलीव रोडवर सध्या श्री शंकर सदाशिवनगर ओंकार शुगर चांदापुरी श्री श्री सद्गुरु शुगर राजेवाडी या कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात असते त्या वाहनांना दिलासा मिळाला आहे. तरंगफळ चांदापुरी मोठेवाडी या भागात बागायती क्षेत्र वाढल्यामुळे शेतकऱ्यांची व त्यांच्या वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असून हा रस्ता पक्का व्हावा ही मागणी गेल्या काही दिवसापासून या भागातील जनता करीत होती ही मागणी लक्षात घेऊन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांनी भरीव निधीची तरतूद केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
माळशिरस ते पिलीव या रस्त्याचे काम दोन भागात असून त्यापैकी माळशिरस ते तरंगफळ हे काम १४ कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे व तरंगफळ ते पिलीव हे काम १० कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे. माळशिरस ते तरंगफळ या कामाची निविदा झाले असून काम प्रगतीत आहे. त्यामध्ये ४ नळी पुलाची कामे पूर्ण झाली असून २ नळी पुलाचे कामे प्रगतीत आहेत तसेच खराब भागांमध्ये खडीकरणाचे काम झाले असून त्यावरून एम पी एम करण्यापूर्वी काही दिवस ट्रॅफिक जाणे आवश्यक असते, सदरचा कालावधी पूर्ण होताच एम पी एम चे( डांबरीकरण)काम हाती घेण्यात येईल. तरंगफळ ते पिलव या कामाची प्रारूप निविदा मंजूर असून पिलीव गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने त्या ठिकाणी आचारसहिता आहे. त्यामुळे सदर निविदा प्रसिद्ध करण्यात आले नाही. – सुनीता पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज
माळशिरस पिलीव रोडची अवस्था दयनीय झाली होती म्हणून आम्ही आमदार रणजीत दादा व आमदार रामभाऊ यांना रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली होती ती मागणी मान्य होऊन रस्त्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहे.
- नारायण तात्या तरंगे, सरपंच तरंगफळ
गेल्या आठ दिवसापासून माझ्या उसाची तोड चालू आहे तो स श्रीशंकर सदाशिवनगर या ठिकाणी जात आहे. प्रत्येक वर्षी दोन ट्रॅक्टर जोडून चढ चढवावे लागत होते परंतु यावर्षी चढ कटिंग झाल्यामुळे एका ट्रॅक्टरने ऊस वाहतूक सुरळीत होत आहे. - गोरख जानकर, ऊस बागतदार तरंगफळ
माळशिरस तालुक्यात मायनस मधील गावांना सुद्धा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आमदार रामभाऊ सातपुते यांनी भरीव निधी दिल्यामुळे काहीजण बातम्या छापून चुकीचा स्टंट करीत आहेत. – सुजित तरंगे, उपाध्यक्ष भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग माळशिरस तालुका