Latest News

माळशिरस तालुक्यातील १० पैकी ८ ग्रामपंचायतीवर मोहिते-पाटील गटाची सत्ता ; शिवरत्न वर गुलालाची उधळण

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : माळशिरस तालुक्यात पार पडलेल्या १० पैकी लवंग,कोंढारपट्टा,वाफेगाव,माळीनगर, सवतगव्हाण,दहिगाव,देशमुखवाडी,धर्मपूरी ८ ग्रामपंचायतींवर मोहिते-पाटील गटाने सत्ता प्रस्थापित करत निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

विजयसिंह मोहीते पाटील,जयसिंह मोहीते पाटील ,आ. रणजितसिंह मोहीते पाटील व आ.राम सातपुते यांच्या कामावर जनतेने विश्वास दाखवल्याने माळशिरस तालुक्यात पार पडलेल्या १० पैकी ८ ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखले असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी बोलताना सांगितले.

माळीनगर ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते सासवड माळी साखर कारखान्याचे चेअरमन असलेल्या रंजन गिरमे यांच्याकडे माळीनगर ग्रामपंचायतीची पाठीमागील दहा वर्ष सत्ता अबाधित होती. यावेळेस जयसिंह मोहिते-पाटील व धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी “लक्ष” देत मोहिते-पाटील विरोधक असलेल्या रंजन गिरमे यांच्या सत्तेला सुरुंग लावला. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक सुभाष दादा निंबाळकर यांना दहा वर्षानंतर सक्रिय राजकारणात उतरवत जनतेतील सरपंचा सहीत १२ जागा निवडून आणल्या व माळीनगर ग्रामपंचायतींवर मोहिते-पाटील गटाचा झेंडा पुन्हा फडकवला.

सन २०२१ रोजी देखील माळशिरस तालुक्यात पार पडलेल्या ४४ पैकी ३६ ग्रामपंचायतींवर मोहिते-पाटील गटाने वर्चस्व राखले होते. त्यानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी रणनिती आखत कृ.उत्पन्न बाजार एकहाती ताब्यात घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!