विशेष

स्थानिक गुन्हे शाखेकडून सोलापूर जिल्हयातील २४ घरफोडी, ०२ चोरी गुन्हे उघड, १५ लाख ५८ हजार ५९० रूपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत.

महर्षि डिजीटल न्यूज

सोलापूर :  स्थानिक गुन्हे शाखाच्या तिन्ही तपास पथकानी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून २४ घरफोडी व २ चोरी असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये १५,५८,५९०/- रूपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिणे, मोबाईल, कॅमेरा व मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांच्या नेतृत्वाखाली सपोनि / धंनजय पोरे व त्यांचे पथकाने सोलापूर ग्रामीण जिल्हयात यापूर्वी झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गोपनिय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त केली, सदर बातमी प्रमाणे मंगळवेढा पोलीस ठाणे गुरंन ४४८/२०२३ भादंवि क. ४५४, ४५७, ३८० या गुन्हयातील आरोपी गोपाळपुर ता. पंढरपूर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती पथकास मिळाली होती. सदर पथकाने गोपाळपुर येथे सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतू त्याचेकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्याने मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, करकंब, टेंभुर्णी व माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरीचे एकूण १५ गुन्हे त्याचे साथीदारा समवेत केल्याची कबूली दिली त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करता सदर गुन्ह्यातील पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपी याचेकडुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील उघकीस आले.नमुद आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी टेंभुर्णी, माढा पोलीस ठाणे येथे , घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, कडील सपोनि / धनंजय हे करीत असुन त्याची मा. न्यायालयाने ५ पोलीस कोठडी सुनावली होती, स्थानिक गुन्हे शाखेच्या नने केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे आरोपीत याचेकडुन वर नमुद गुन्हयातील ८,७४,३००/- रु. चे २३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३५० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे

नमुद आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी टेंभुर्णी, माढा पोलीस ठाणे येथे दरोडा, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, कडील सपोनि / धनंजय पोरे हे करीत असुन त्याची मा. न्यायालयाने ५ पोलीस कोठडी सुनावली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे आरोपीत याचेकडुन वर नमुद गुन्हयातील ८,७४,३००/- रु. किमतीचे २३० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३५० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे पोनि सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकाने वेळापूर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुरनं २५६/२०२३, भा.द.वि.क. ४५७,३८० या गुन्हयाच्या तपासकामी बारकाईने व फिर्यादीशी सविस्तर विचारपूस करता फिर्यादीचे घराचे बांधकाम करण्यासाठी पूर्वी आलेला बोरगाव, ता. माळशिरस येथील इसमावर संशय बळावला होता. त्या इसमास ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले त्याचेकडे तपास करता गुन्ह्यात चोरी गेलेला १० तोळे २ ग्रॅम वजानाचे दागिणे व १० चांदीचे बार व मोटार सायकल असा ५,३३,१००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरचा गुन्हा हा गुन्हा घडल्यापासून १० दिवसाच्या आत सपोनि शेळके व पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून उघडकीस आणला असून त्यामध्ये गुन्हयातील गेला मालापैकी १०० टक्के मुद्देमाल जप्त केला आहे.

सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सुबोध जमदाडे यांच्या पथकाने पंढरपूर उपविभागामध्ये यापूर्वी झालेल्या मालाविषयी गुन्हयांचा विस्तृत व बारकाईने विश्लेषण केले असता उपविभागातील बऱ्याचा गुन्ह्यामध्ये एकच गुन्हयांची कार्यपध्दती वापरून गुन्हे झाले असल्याचे दिसून आले. त्याबाबत गोपनिय माहिती काढला असता पंढरपूर येथील एक इसमाने चोरीचे गुन्हे केले असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली होती. सदर आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पथकाने पंढरपूरमध्ये सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतू त्याचेकडे पथकाने कौशल्यपूर्ण तपास करता त्याने पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका व पंढरपूर ग्रामीण मधील एकूण ९ गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. तसेच त्यांचेकडून सदर गुन्हयातील १,९१,२९०/- किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिणे, मोबाईल व रोख रक्कम हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे पोसई सुबोध जमदाडे यांच्या पथकाने ९ गुन्ह्यातील एकूण १,९१,२०९/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघडकीस आणले आहेत. सन २०२३ मध्ये आज अखेर स्थानिक गुन्हे शाखेने मालाविषयीचे दरोडा १, जबरी चोरी ५, घरफोडी ७३ व चोरीचे ४४ असे एकूण ११७ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये १,०५,६८,७६९/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धनंजय पोरे यांच्या पथकातील सपोफी/ख्वाजा मुजावर, श्रीकांत गायकवाड, निलकंठ जाधवर पोहेकों/परशुराम शिंदे, सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, पोकों/विनायक घोरपडे, समर्थ गाजरे, दिलीप थोरात यांनी पार पाडली आहे. तर सपोनि शशिकांत शेळके यांच्या पथकातील पोसई राजेश गायकवाड, सहाफी नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, धनाजी गाडे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, यश देवकते समीर शेख यांनी पार पाडली आहे. तसेच पोसई सुबोध जमदाडे, यांचे पथकातील श्रेणी पोसई बिराजी पारेकर, सहा. फो. शिवाजी घोळवे, पोह प्रकाश कारटकर, पोना रवि माने, पोकाँ अन्वर अत्तार, पोकों अजय वाघमारे, सुरज रामगुडे, चपोहेकॉ प्रमोद माने यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!