सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक डॉ.राजकुमार देशमुख उत्तम अभियंता पुरस्काराने सन्मानित
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : येथील डॉ. राजकुमार मोहनराव देशमुख यांना उत्तम अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शासकीय अधिकारी व कर्मचारी कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक मंच सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या उत्तम अभियंता २०२३ पुरस्कार वितरण सोहळा दि. २६ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पार पडला. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, माजी उपमहापौर प्रा. नसीम पठाण, आयोजक आशितोष नाटकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
डॉ. देशमुख हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तम अभियंता हा पुरस्कार नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील, आपल्या कामाचे कौतुक कोणी जाणीवपूर्वक केले तर ते मनाला सुखावून जाते आणि पुढील प्रगतीसाठी स्फूर्ती मिळते असे मत डॉ. देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले. वडील मोहनराव देशमुख, आई संगिता, पत्नी अनुजा यांनी हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला असून सर्व स्तरातून डॉ. देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.