विशेष

जुन्या बसस्थानकातील खड्डे बनले जीवघेणे ; एस टी च्या चाकाखालचा खड्ड्यातील दगड उडून अनेकजण जखमी

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : अकलूज चे नवीन बस स्थानक सोलापूर जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर वर असताना जुने बस स्थानक मात्र प्रवासी व परिसरातील नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहे. याला कारण म्हणजे बस स्थानक परिसरात पडलेले खड्डे व पसरलेले दगड आहेत.

अकलूज येथील जूने बसस्थानकातून टेंभुर्णी,श्रीपूर बोरगाव माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गावातील प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर असते तसेच जून बसस्थानक हे मंडईच्या समोर अगदी गर्दीच्या मोक्याच्या ठिकाणी आहे. 

मात्र अकलूजचे जूने बसस्थानक हे प्रवाशांच्या सोई करीता आहे की, मृत्यूचे आगार आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे, जून्या बसस्थानकाच्या सदाभाऊ चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मार्गावरील प्रवेशद्वाराव खड्डे पडलेले असून बसस्थानक हद्दीत मोठ्या प्रमाणावर दगडाचा खच साचलेला आहे. 

जून्या बसस्थानकात प्रवेश करीत असलेल्या एस.टी बसच्या चाकाखाली उघड्यावर पडलेले दगड येऊन अण्णाभाऊ साठे चौक ते सदाभाऊ चौक मार्गावर दुचाकीवर प्रवास करत असलेल्या पत्रकार समाधान वाघमारे यांना दगड यांना लागला सुदैवाने दगड डोक्याच्या खाली लागल्याने अनर्थ टळला मात्र या प्रसंगातून अकलूजचे जूने बसस्थानक प्रवाशांसह इतर नागरिकांसाठी मृत्यूचे आगार बनले आहे का? 

जूने बसस्थानकांच्या आवारात खड्डे बुजवण्यासाठी दगड येऊन पडलेले आहे मात्र खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत हे दगड आवारात विखुरले जाऊन बसच्या चाकाखाली येऊन प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत

दुर्देवाने अनुचित घटना घडल्यास याला आगार व्यवस्थापक किंवा इतर संबंधित विभागातील अधिकारी जबाबदारी घेतील का ? मृत्यूस कारणीभूत ठरू शकणाऱ्या दगडांवर जबाबदारी ढकलतील 

बसच्या चाकाखाली आलेला दगड लागल्यानंतर आगार व्यवस्थापक शिंदे यांना तक्रार देण्यास गेलो असता ते उपस्थित नव्हते तेथे उपस्थित असलेले संबंधित अधिकारी अनिरुद्ध सुर्यवंशी यांना जुने बसस्थानक हद्दीत दगडाचा खच पडलेला दाखवला तेव्हा दोन दिवसांत खड्ड्यांची डागदुरूस्ती करून घेऊन पडलेल्या दगड उचलून घेऊ असे सांगीतले. - पत्रकार समाधान वाघमारे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!