महाराष्ट्र

जिल्ह्यातील नागरिकांनी अनोळखी व्यक्ती, भाडेकरू यांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी – अप्पर जिल्हादंडाधिकारी

महर्षि डिजीटल न्यूज

सोलापूर : फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम144 अन्वये सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा, जुने वाहन विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाडयाने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

कोणत्याही अनोळखी नवीन रहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्हयात जी जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस ठाणेला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलीसांना माहिती न देता उपलब्ध करुन देणे. 2. कोणत्याही अनोळखी नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपुर्ण माहिती तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनओळखी व्यक्तींची पोलीसांना माहिती न देत जुने वाहन खरेदी विक्री  भाड्याने उपलब्ध करून देणे. 

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी च्या पत्रानुसार सदर चा आदेश हा दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी ते दि. 5 नोव्हेंबर 2023 ( दोन्ही दिवस धरून) सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत लागू राहील, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी निर्देशित केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!