कार्यकर्त्यांना का वाटतंय आता “मीच” खासदार होणार…?

डी एस गायकवाड
महर्षि डिजीटल न्यूज
फ्री माईंडेड नेता म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्व सुपरिचित आहे. या त्यांच्या गुणामुळे प्रत्येक जण या नेतृत्वाजवळ अगदी मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे व्यक्त होऊ शकतो. या कारणाने त्यांचे नेतृत्व प्रत्येकाला जवळचे आणि हक्काचे व्यासपीठ असल्यासारखे वाटते. जी आज पर्यंत त्यांना पदे मिळाली त्या प्रत्येक पदाला ऐतिहासिक कामगिरी करून त्यांनी न्याय दिला.यामुळे कार्यकर्ता आणि त्यांच्यामध्ये कधीच अंतर पडले नाही. जे असेल ते रोखठोक आणि सरळ सरळ बोलून करणे या त्यांच्या स्वभावामुळे कार्यकर्ता त्यांच्यापासून कधीच दूर गेला नाही आणि या सर्व कारणामुळेच “धैर्यशील मोहिते पाटील म्हणजेच मी” अशा भावना वाढीस लागून धैर्यशील मोहिते पाटील हे जर खासदार झाले तर मीच खासदार असणार आहे अशा भावना मतदार संघातील प्रत्येकाच्या होताना दिसत आहेत. इथे आपण बोलू शकतो, आपल्या कल्पना मांडू शकतो, आपली सामाजिक संकल्पनेची स्वप्ने साकार करू शकतो… असे प्रत्येकाला आता मनोमन वाटू लागले आहे आणि यातूनच तेच खासदार व्हावेत.. या लोकांच्या भावना आता ओठावर येताना दिसत आहेत.
विद्यमान महाशय खासदाराकडून झालेला भ्रमनिराश आणि लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका यातून लोकांचा आशावाद बळावलेला दिसत असून यातूनच आपल्या हक्काचा माणूस धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार व्हावेत आणि त्या माध्यमातून लोकाभिमुख कारभाराची पुन्हा एकदा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखी झेप पहायला मिळावी यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव जनता जनार्दनाच्या मंदिरातून पुढे येताना दिसत आहे. आणि हे नाव पुढे येत असताना दुसरी एक गंमत पाहायला मिळत आहे ती म्हणजे आत्ता प्रत्येकालाच खासदार व्हावंसं वाटू लागला आहे त्याचं कारण असं आहे की, धैर्यशील मोहिते पाटील हे रात्रंदिन आपल्या कार्यकर्त्यासाठी तत्पर असतात, विकासासाठी अविरतपणे संघर्ष करताना दिसतात, प्रत्येकाच्या अडीअडचणी वेळी मदत करणारा नेता म्हणून त्यांचा नावलौकिक वाढलेला आहे, लोकात मिसळून कामे करणे ही त्यांची खासियत राहिली आहे, कोण केव्हाही फोन करू शकेल असा हा नेता आहे, माढा लोकसभेसाठी एक विकासाचे मॉडेल ते अख्या देशात उभे करू शकतील असे त्यांचे नेतृत्व…, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपातून आपल्यालाही खासदार होता येईल अशीच सुंदर कल्पना प्रत्येकाच्या मनात तरळू लागली आहे. म्हणूनच प्रत्येकाला खासदार होण्याची संधी या निमित्ताने मिळतेय अशी भावना व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. धैर्यशील मोहिते पाटील म्हणजेच मी… आणि म्हणूनच आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्या नावाचा माढा मतदारसंघात जोर वाढताना दिसत आहे. रोखठोक राजकीय भूमिका, कार्यकर्त्यांना मिळणारा मानसन्मान, सदैव नवीन काहीतरी करण्यासाठी धडपड, उचित गुण पारखून अनेकांना त्यांनी दिलेली वेगवेगळ्या क्षेत्रात संधी, अशा अनेक गुणांमुळे लोकांना त्यांचे नेतृत्व सध्या भावते आहे.. आणि यातूनच त्यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुढे येताना दिसत आहे.