लवंगच्या जि. प. शाळेतला गावकऱ्यांकडून तब्बल 1 लाख 52 हजारांच्या साहित्याची मदत

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : लवंग ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेला गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तब्बल 1 लाख 52 हजारांच्या साहित्याची मदत करण्यात आली.
भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लवंग येथील जिल्हा परिषद शाळेला 96000 रुपयांच्या 16 सायकली गावकऱ्यांनी दिल्या, 7000रुपयांच्या खुर्च्या, 28000रुपयाची विद्यार्थी बक्षिसे, 11000रुपयांची ग्रंथालयास पुस्तके, 10,000 रुपयांची लाल माती अशाप्रकारे 152000चा शैक्षणिक उठाव करण्यात आला.
यामध्ये सज्जन दुरापे 41000, बिभीषण भोसले , 40,000 निशांत दादा पाटील 25000 रुपये, प्रशांत पाटील 10000 रुपये, मधुकर वाघ 10,000 सदाशिव अवताडे 6000 व इतर काही मिळून 152000 रुपये जमा झाले. अशाच प्रकारची वर्गणी सांगली पुर ग्रस्थाना रिलीफ फंडात शाळेने गावच्या मदतीने केली होती.
याकामी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय लोखंडे यांनी परिश्रम घेतले.