जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरझणी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरझणी येथे ७६ वा प्रजासत्ताकदिन पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
सरपंच सौ.गंगुबाई महादेव साठे, उपसरपंच, सौ.राणी सोपान माने, ग्रामसेवक अश्विनी योगिनाथ सावंत, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, आरोग्य सेविका.वसावे मॅडम, सौ.जया सतीश पालकर, आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थी निर्मित”किलबिल” या हस्तलिखित अंकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. “साने गुरुजी” जयंती निमित्त घेतलेल्या “श्यामची आई ” या कथामालेवर आधारित परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण आणि बक्षीस वितरण करण्यात आले.
बहारदार अशा नृत्य आविष्काराने उपस्थित मान्यवरांचे मनोरंजन कऱण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची भाषणे सादर करण्यात आली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी, पालकांनी, ग्रामस्थांनी कौतुकास्पद अभिनंदनपर बक्षिसेही दिली.