उत्तमराव माने यांच्या तीन पिढ्यांचे अधिवेशनप्रेम आणि कार्यनिष्ठा उल्लेखनीय ; पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडून उत्तमराव माने यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे कौतुक

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : समाजकार्य व पुरोगामी विचारांची जपणूक करणाऱ्या मराठा सेवा संघाचे अकलूज अधिवेशन नुकतेच १०, ११ आणि १२ मे २०२५ रोजी महाव्यवस्थेत व महाउत्साहात संपन्न झाले आहे. या कार्यक्रमाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारणीच्या सहकार्याने झालेल्या नेटच्या नियोजनाचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शब्दसुमनांनी कौतुक केले आहे.

त्यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशात, आयोजक मराठा सेवा संघ सोलापूर, अकलूज, पंढरपूर येथील सहकाऱ्यांनी तेथील श्रीमंतीला शोभून दिसेल अशी सर्व व्यवस्था केली त्यामुळे त्यांचीही जरा निराशा झाली आहे असे लक्षात येते. असे असले तरी अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी त्यांनी मनापासून धावपळ तसेच जुळवाजुळव केली होती. याचा अभिमान वाटतो. यासाठी सर्वच सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन व आभार मानले आहेत.

ते पुढे म्हणतात अकलूज अधिवेशन एका शिस्तबद्ध केडर कैंप सारखे झाले. विविध प्रकारच्या विषयावर चर्चा व माहीतीपूर्ण व्याख्याने झाले. खूपच टाईट शेड्युल होते. दररोज रात्री उशिरापर्यंत सुरू राहिले. परिणामी सकाळी सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या कवींच्या कविता ऐकून प्रतिसाद देणारे प्रेक्षक नव्हते. तर सकाळचे सत्र उशिरा सुरू झाले. उपस्थितांना उसंत घ्यायला वेळ न मिळाल्याने असे होते. यासाठी आयोजक वा कार्यकारिणी कोणी जबाबदार नसतात.

मराठा सेवा संघाच्या शिरस्ता व रिवाजाप्रमाणे अकलूज अधिवेशनात शाही भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, आसन व्यवस्था, मनोरंजन व्यवस्था होती. अकलूज येथील सर्वच क्षेत्रात असलेली अत्याधुनिक श्रीमंती आपल्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात पहावी व परतीनंतर आपल्या परिसरात अवलंब करावा अशी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि डॉ.विजय घोगरे साहेब यांची अपेक्षा होती. अर्थातच सर्वच अपेक्षा पूर्ण होत नाहीत. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रम असणारे अकलूज अधिवेशनाने एक इतिहास घडवला आहे हे निश्चित. दहा मे रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे अधिवेशन १२ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होते. या अधिवेशनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जिजाऊ ब्रिगेडचे अभिनंदन. तर काही आयोजक सहकुटुंब उपस्थित होते.

विशेष म्हणजे, माने कुटुंबीयांच्या तीन पिढ्या अधिवेशनात उपस्थित होत्या आणि त्या सर्वांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत अधिवेशनास यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या कार्यनिष्ठेचा आणि सेवाभावाचा आदर्श इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. उत्तमराव माने यांच्या कुटुंबातील डॉ. अमोल आणि अजित हे कलाकार असून त्यांचे योगदान सांस्कृतिक कार्यक्रमात महत्त्वाचे होते. तर स्वतः आक्का बाई माने यांनीही सांस्कृतिक सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एका कुटुंबाने अशा तऱ्हेने कार्यात स्वतःला झोकून देणे हे समाजासाठी आदर्शवत ठरावे, असेच आहे.

अकलूज अधिवेशनात मराठा सेवा संघाचे अपवादात्मक सहकारी वगळता बहुतांश लोक एकटे आले होते. त्यात मी सुद्धा एक होतो. तर काही जबाबदार सहकारी जणू काही दारावर जाण्यासारखे उपस्थित राहून परतले. अकलूज हे आमच्या आयुष्यातील एकमेव असे अधिवेशन झाले आहे की ज्यात अति थकवा व उन्हामुळे रेखाताई खेडेकर सहभागी होऊ शकलेल्या नाहीत . यावरून मला अंदाज येत आहे .

मराठा सेवा संघ व ३३ कक्ष पुनर्बांधणी व बळकटीकरण हाच पुढील तीन महिन्यांत आपला एकमेव कार्यक्रम असावा . कमीत कमी जूने व जास्तीत जास्त नवे सहकारी शोधून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात यावी . जून्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी नाराज न होता मार्गदर्शन करावे . यासाठी इंजि डॉ विजय घोगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा अर्जून तनपुरे सर व सहकारी विभागवार निवड समिती गठीत करतील . मराठा सेवा संघ व ३३ कक्ष केंद्रीय राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात यावी अशी अपेक्षा आहे . याबाबत चर्चा झाली आहे . इंजि डॉ विजय घोगरे यात लक्ष्य घालून कार्यक्रम जाहीर करतील .
यातील पहिल्या टप्प्यात सध्या कार्यरत व इच्छुक जिल्हा , विभाग व राज्य कार्यकारिणी मधील सदस्यांना ऑनलाईन बैठक घेऊन माहीती देणे . तसेच जून महिन्यात पहिल्या आठवड्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , जिजाऊ रथयात्रा आयोजन कृतज्ञता समारंभ एकाच दिवशी सर्वच तालुका , जिल्हा , महानगर ठिकाणी आयोजित करावा . हे एक अर्ध्या दिवसाचे अधिवेशन मानता येईल . यात निवड समिती गठीत करण्यात यावी . तसेच इच्छुक नांवे घेऊन यादी तयार करावी . नंतर ३० जून २०२५ पर्यंत राज्य , विभाग व जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात येईल असे नियोजन करावे . शिवश्री सोमनाथ लडके समन्वयक म्हणून लक्ष्य देतील . सगळीकडेच पन्नास टक्के महिलांना सहभागी करून घेणे . प्रमुख पदाधिकारी महिलांना प्रोत्साहन देणे हीच विनंती .

यानंतर जूलै महिन्यात यादी जाहीर केली जावी . जूलै तिसऱ्या आठवड्यात नूतन कार्यकारिणी बैठक आयोजित करावी . नंतरच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सर्वच कार्यकारिणी सदस्यांसाठी तीन दिवसीय निवासी केडर कैंप आयोजन केले जाईल . याच काळात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने स्थानिक बांधणी , बैठका , अधिवेशन असे कार्यक्रम सुरू ठेवावेत .
पावसाचा अंदाज घेऊन जूलै ऑगस्ट महिन्यात तीन दिवसीय शिवमेळा आयोजन केले जाईल . एका जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा सहभाग राहिलं . जिल्हा कार्यकारिणी नावे देईल . यासाठी प्रत्येक कुटुंबाला आगाऊ पाच हजार रुपये रोख भरावे लागणार आहेत .

अकलूज अधिवेशनात बरीच नवीन माहिती मिळाली आहे . तसेच नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रोत्साहन मिळाले आहे . नवीन कार्यकारिणी जाहीर होताच नवीन जोमाने ऑक्टोबर नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा कार्यक्रमांची रेलचेल सुरू होईल असा विश्वास व्यक्त करतो.
दहावी बारावीच्या परीक्षेत आपल्या कुटुंबातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत . त्या सर्वांचेच खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा .

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या शुभेच्छा संदेशामुळे सेवा संघाच्या सर्व सदस्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. आगामी काळात सर्व सदस्य अधिक जोमाने व स्फूर्तीने कामाला लागतील यात शंका नसल्याचे उत्तमराव माने यांनी सांगितले. शुभेच्छा संदेशाबद्दल, केलेल्या कौतुकाबाबत तसेच या नात्यांचा वाढदिवस महाअधिवेशनात साजरा केल्या बद्दल पुरुषोत्तम खेडेकर यांचे आभार व्यक्त करताना उत्तमराव माने यांनी महा अधिवेशन यशस्वी संपन्न झाल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त करताना उद्घाटक विजयसिंह मोहिते पाटील, स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील तसेच मोहिते-पाटील कुटुंबीय स्थापनेपासून सेवा संघाचे उपक्रमात सहकार्य करत आलेले आहे त्याचप्रमाणे अधिवेशनात देखील त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू कला आश्रयदाता पुरस्कार स्वीकारून बहुमोल असे मार्गदर्शन केल्याबद्दल सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले.
विशेष पुरस्कारासाठी निवड झालेले किरण माने सिनेअभिनेते, जन्मेंजय राजे भोसले, शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी पुरस्कार स्विकारला त्याबद्दल आभार मानले. शिवाय वेगवेगळ्या सत्रात आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार दत्तात्रय सावंत, अमोल बापू शिंदे यांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त केले. शिवाय अकलूजचा इतिहास व विकास दाखवणारी चित्रफित बनवलेल्या डॉ. विश्वनाथ आवड यांचेही विशेष आभार मानले.

सर्व व्याख्यान सत्रासाठी आलेले विचारवंत, व्याख्याते यांचेही, संस्थापक अध्यक्ष खेडेकर साहेब व प्रदेशाध्यक्ष घोगरे साहेब,महासचिव शिखरे साहेब,कार्याध्यक्ष घाडगे साहेब केंद्रीय कार्यकारिणी सर्व सदस्य यांनी सोलापूर जिल्ह्याला आयोजनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार साहेब व सहकारी, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व सर्व सदस्य, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके त्यांचे सर्व सहकारी सदस्य, जेष्ठ मार्गदर्शक निर्मलकुमार देशमुख, प्रा.अर्जुन तनपुरे, मधुकर मेहेकरे ,नेताजी गोरे,सर्व राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य यांचेही आभार व्यक्त केले आहेत. सर्व माध्यमातील वार्ताहर, पत्रकार, फोटोग्राफर यांचेही उत्तमराव माने यांनी विशेष आभार व्यक्त केले.
असाध्य ते साध्य करिता सायास |
कारण अभ्यास तुका म्हणे ||
सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण टीमने अथक परिश्रम करून अधिवेशनात सहभागी होऊन ते यशस्वी केले त्यांचे, अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी म्हणजेच झेंडा लावणे, स्वागत कमानी उभा करणे, जेवणाची तयारी करणे, हॉल मधील व्यवस्था पाहणारे, शोभा यात्रा,हलगी वादक,तुतारी वादक,सूत्रसंचालन करणारे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेले सर्व कलाकार, पडद्यामागे काम केलेले सर्व सेवक, निवासव्यवस्थासाठी पळणारे सर्व, आर्थिक सहाय्य केलेले देणगीदार या सर्व कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करतो…तसेच माझे सर्व कुटुंबीय व नातेवाईक यांचेही आभार केले.
शेवटी स्थानिक असल्याने पाहुणचार करण्यात काही कमी राहिली असल्यास सर्वांची दिलगिरी व्यक्त करतानाच आमच्या संपूर्ण माने कुटुंबाचा विचारपिठावर बोलावून सन्मान केला त्याबद्दल आभार मानले.
तन मन धन दिले पुरुषोत्तमा | आशा नाही कवनाची ||
तुका म्हणे परिसाहुनी आगळा | काय महिमा वर्णू तयाची ||
मराठा सेवा संघाचा म्हणजेच पुरुषोत्तम खेडेकर यांचा परीसस्पर्श होऊन आपल्या मराठा सेवा संघाच्या आगामी सर्व कार्यास निश्चितपणे सुवर्णझळाळी प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.