श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या नियोजनासाठी अकलूजमध्ये बैठक

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत्या २३ व २४ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या नियोजनासाठी अखिल भारतीय श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघ यांच्यावतीने अकलूज येथे नियोजन बैठक पार पडली. सहारा इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत संत नामदेव महाराजांचे १८वे वंशज ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज नामदास, ह.भ.प. श्री महेश ढवळे, संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री गणेश उंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत कार्यक्रमाचे स्वरूप, व्यवस्थापन व सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली. अकलूज व परिसरातील समाज बांधवांची तसेच महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती ही या बैठकीची विशेषता ठरली.
कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी डॉ. सौ. श्रद्धा राहुल जवंजाळ यांनी स्वीकारली असून, त्यांनी या बैठकीचे प्रभावी सूत्रसंचालन देखील केले. बैठकीस नाना जवंजाळ, किशोर चांडोले, सचिन जवंजाळ, श्रेयस चांडोले, संतोष जामदार, उदय जामदार, पंढरपूर येथील विशाल धट, तसेच महिला सदस्यांमध्ये भारती चांडोले, सारिका जामदार, ऐश्वर्या चांडोले, अश्विनी जामदार, सुनिता चांडोले, लीलावती जामदार आदींची उपस्थिती उल्लेखनीय होती.
या बैठकीत महेश ढवळे यांनी संजीवन समाधी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. उत्कृष्ट नियोजन, उत्साही सहभाग व सौहार्दपूर्ण वातावरणामुळे ही बैठक अत्यंत यशस्वी ठरली.