शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या ई-नाम योजनेमुळे विक्री व्यवहारात पारदर्शकता; शेतकऱ्यांना आर्थिक लाभ — कृषी मंत्रालयाचे मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांची माहिती

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘ई-नाम’ (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची ठरत असून या प्रणालीमुळे शेतमालाच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.
राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजनेत अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्त आज बाजार समितीच्या MACP गोदामात शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, तोलार, शेतकरी कंपनीचे पदाधिकारी तसेच बाजार समितीचे कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, संचालक आनंद फडे, उद्धव डांगरे, बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना कटरे म्हणाले की, “ई-नाम प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळणार असून बाजार समितीत थेट व्यवहारामुळे दलालांची गरज उरणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होईल.”
या प्रणालीमुळे देशभरातील बाजारांतील व्यापारी ऑनलाईन बोली लावू शकतील. परिणामी, शेतमालाला अधिक स्पर्धात्मक दर मिळण्याची शक्यता असून व्यवहाराची सुलभता आणि सुरक्षीतता यामध्ये वाढ होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी समितीकडे आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर नोंदवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदी विक्री संबंधी सध्याचे व्यवहार व त्यामधून होत असलेले संभाव्य धोके नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी तर आभार उपसचिव दिनेश माने देशमुख यांनी मानले.