धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचा प्रमोशन सोहळा आणि ‘डान्स मेनिया 2025’ वर्कशॉपचा भव्य समारोप अकलूजमध्ये उत्साहात संपन्न

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त “लय भारी प्रोडक्शन” निर्मित ‘धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर : एक युग’ या चित्रपटाचा प्रमोशन सोहळा तसेच साई सहारा एज्युकेशन अँड मेडिकल हेल्थ अकॅडमी, अकलूज व कलामूर्ती डान्स अकॅडमी, अकलूज आयोजित ‘डान्स मेनिया 2025 – समर डान्स वर्कशॉप वॉल्यूम 5’ चा भव्य समारोप व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम स्मृती भवन, अकलूज येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद सदस्य स्वरूपाराणी मोहिते पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या सिने अभिनेत्री अश्विनीताई महांगडे, ज्यांनी आपल्या उपस्थितीने संपूर्ण सोहळ्यात चारचांद लावले.

कार्यक्रमास डॉ. कविता कांबळे मॅडम व डॉ.मानसी इनामदार यांनी विशेष पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवली. साई सहारा हेल्थ अँड एज्युकेशनल अकॅडमीच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा जवंजळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन उत्तमरित्या सांभाळले.
‘धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुशांत सोनवले आणि निर्माते सोमनाथ शिंदे यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रताप थोरात, अक्षय मंडलिक, दत्तात्रेय घुले, सुहास जाधव, महेश शिंदे, राहुल राजे, संदेश कदम, भूमिका पाडोळे, पूजा शिरसागर, राहुल लेंगरे, सुशांत गुरव आदींचीही उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विविध डान्स परफॉर्मन्स, कलाकारांचे संवाद, आणि चित्रपटाची झलक उपस्थितांना अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देखील उत्साहवर्धक होते. एकूणच, अकलूजकरांनी या सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.