शहर

जयशंकर उद्यान, अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज :  जयशंकर उद्यान, अकलूज येथे अकलूज नगर परिषदेच्या वतीने “कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आर्वी व उर्वी यांच्यासह अजित माने, पुष्कराज अमोल माने यांनी यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी विचारपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, हिंदुराव माने पाटील, मराठा सेवा संघाचे इंजिनिअर उत्तमराव माने, अण्णासाहेब शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी खुळे साहेब, भारत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनिअर उत्तमराव माने यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात गेल्या २५ वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिन अकलूज ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या वतीने सातत्याने साजरा होत असल्याची माहिती दिली.

आपल्या भाषणात शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी, जयशंकर उद्यानात आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांतून लवकरच राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सन्मान गुलाबपुष्प व छत्रपती ताराराणी यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देऊन करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते महादेवराव दळवी, बंटी जगताप, सचिन गायकवाड, बबनराव शेंडगे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित उत्तमराव माने यांनी तर आभार प्रदर्शन निनाद पाटील यांनी केले.

या कार्यक्रमास नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी दत्तात्रेय लावंड, विशाल केचे, राजेंद्र मिसाळ, भारत सांगडे, विठ्ठल कोडक तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या हेमलता मुळीक, अक्काताई माने, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, सुवर्णा घोरपडे, हेमलता सांगळे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाला शिवाजीराव लोंढे, रहीम मुलाणी तसेच समविचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!