संजय गोरवे सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड ; सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर जिल्हा सरचिटणीसपदी पद्मावती नगर बागेची वाडी अकलूज येथील संजय गोरवे यांची नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या वेळी कार्यक्रमास जेष्ठ मार्गदर्शक मनोहर जावीर महाराज, नरेंद्रजी भोसले साहेब, बिरदेवजी केंगार, सचिन करडे, सतीश शिंदे, अमोल आईवळे, राजाभाऊ आवळे, विकास भडंगे, बापू गेजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संजय गोरवे हे होलार समाज शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून परिचित असून, समाजातील दुर्लक्षित घटकांच्या न्यायासाठी त्यांनी नेहमीच आघाडी घेतली आहे. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध उपक्रम, मोफत मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सामाजिक न्याय विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संजय गोरवे यांचे अनुभव आणि नेतृत्व निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
होलार समाजाच्या सशक्तीकरणासाठी समर्पित राहून सामाजिक सलोखा आणि प्रगती साधणाऱ्या संजय गोरवे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.