शहर

दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नातेपुते येथे वतीने सवलतीत हरभरा डाळीचे वाटप

महर्षि डिजीटल न्यूज

नातेपुते : दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नारीशक्तीच्या सन्मानार्थ योजलेल्या उपक्रमाचा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते प्रभाग क्र ५ येथील शिवसेना भवन येथे सवलतीच्या दरात हरभरा डाळ वाटपाचा प्रारंभ शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी राजकुमार हिवरकर पाटील यांनी बोलताना, शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणून सर्वांचा दसरा दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला लागणाऱ्या हरभरा डाळीचे प्रत्येक आधार कार्डाला पाच किलो हरभरा डाळ प्रति किलो ६० रुपये प्रमाणे शुल्क आकारून सवलतीच्या दरात पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, नगरसेवक रावसाहेब पांढरे, तालुका उपप्रमुख नितीन कोरटकर, दहिगाव जि. प. गटप्रमुख प्रमोद चिकणे, वर्षा धाईंजे, महेश लांडगे, गटनेते दादाभाई मुलाणी, शहरप्रमुख पोपटराव शिंदे, सागर बिचुकले, आकांक्षा पैठणकर, मनोज जाधव, सनी बरडकर, सुरेश तवटे, अमोल नकाते, सुनील बनकर, जगदीश देशपांडे, जावेद मुलाणी, रमेश पानसकर, संजय टेंबरे, सागर साळुंखे आदिसह शिवसेना पदाधिकारी, महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!