सहकार महर्षी कारखान्याचा 62 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात ; कामगारांसाठी ८.३३ टक्के बोनस जाहीर
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सहकार महर्षी साखर कारखान्याचा बॉयलर 62 वा अग्निप्रदीपन चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कारखान्याच्या ६२ व्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभास कारखान्याचे जेष्ठ संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आजी माजी संचालक, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले सभासद व शेतकरी वर्ग उपस्थित होता.
यावेळी अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी कारखान्याने या गळीत हंगामात दहा लाख मीटरचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगत कामगारांसाठी ८.३३ टक्के तर रोजंदारी कामगारांसाठी (कंत्राटी,डेलीबेसीस) ११ टक्के बोनस जाहीर केला. पावसाने ओढ दिल्याने ऊस लागवड अत्यंत कमी झाली असून कृष्णा भीमा स्थिरीकरणारोबरच नीरा कालव्यास समांतर जलवाहिनी होणे गरजेचे असून त्यासाठी आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न करावेत असे सांगितले.
यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी गत गळीत हंगामाचा आढावा घेतला. इथेनॉलची निर्मिती वाढिसखठी गतवर्षी इथेनॉलच्या ५ हजार मे.टनाच्या दोन टाक्या केल्या तर यावर्षी ८ हजार मे.टनाची एक टाकी तयार करीत असल्याचे सांगितले त्याचबरोबर गव्हाणीमध्ये मॅग्नेट युनिट बसवणार असल्याचे सांगितले. कारखान्याने गेली दोन वर्षे शंभर टक्के एफआरपी जिल्ह्यात सर्वप्रथम दिली असून उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यात देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. व्हाईट चेअरमन शंकरराव माने देशमुख यांनी आभार मानले.