शिवसेना नेते शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे आरोग्य शिबिर संपन्न
महर्षि डिजीटल न्यूज
नातेपुते : नातेपुते येथे ग्रामीण रुग्णालयात शिवसेना संपर्क संपर्कप्रमुख शिवसेनेचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी महा आरोग्य शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आनिता लांडगे वैद्यकीय अधिकारी एम पी मोरे सामाजिक कार्यकर्ते सागर बिचुकले सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे नम्रता होरा मॅडम प्रमोद चिकने व्यासपीठावर उपस्थित होते यामध्ये शाळेतील वय वर्ष १ ते १८ वर्षापर्यंतच्या मुला- मुलींचे आरोग्य तपासणी तसेच गरोदर माता यांची तपासणी तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की घरातील जर माता सुरक्षित असेल तर निश्चितच घर सुरक्षित असते त्यामध्ये आज पर्यंत महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत करण्यात आलेल्या विविध पाच हजार रुग्णांचे मोफत ऑपरेशन केले तसेच नातेपुते येथे नव्याने मंजूर झालेल्या शंभर खटांचे महिला रुग्णालय लवकरच चालू करण्यात येईल असेही आश्वासन दिले तसेच आलेल्या आशा वर्कर ए एन एम सिस्टर तसेच डॉक्टर यांच्या विविध अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल असे सांगितले यावेळी आरोग्य विभागाचे भीष्म मार्गदर्शक श्रीयुत डॉक्टर एम पी मोरे साहेब यांनीही राजकुमार हिवरकर पाटील करत असलेल्या कामाचे कौतुक केले तसेच त्यांना शुभेच्छा ही दिल्या.
वेळोवेळी अडचणीला ते स्वतः खंबीरपणे उभे राहतात याबद्दलही त्यांचे कौतुक केले यावेळी दवाखान्याची अतिशय चांगली स्वच्छता ठेवल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या स्वप्नातील दवाखाना स्वच्छ ठेवल्याबद्दल जयश्री अटक यांचा विशेष सत्कार नगराध्यक्ष अनिता लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर बीचुकले विशाल साळवे भाजपचे मनोज जाधव भाजप युवा चे मीडिया प्रमुख सुनील बनकर गटनेते दादा मुलांनी जिल्हा परिषद गटप्रमुख प्रमुख प्रमोद चिकणे राजू मुलांनी सागर साळुंखे संजय भरते माऊली देशमुख यांचे शेकडो शिवसैनिक डॉ आंबेडकर मॅडम डॉ शेंडगे डॉक्टर पोटे नडे जावेद मुलानी जयश्री अटक तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.