Latest News

  • तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महर्षि डिजीटल न्यूज  पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती…

    Read More »
  • बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

    महर्षि डिजीटल न्यूज  पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे…

    Read More »
  • कार्यकर्त्यांची सोबत… जनतेची साथ… माढा विधानसभेच्या लिड मध्ये शिवतेजसिंहांचा हात

    महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरातअकलूज : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघातून सर्वांना अपेक्षित असलेल्या धैर्यशील…

    Read More »
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘कृषी पंढरी महोत्सव-२०२४’ या प्रदर्शनाचे उद्घाटन

    महर्षि डिजीटल न्यूज पंढरपूर: दि.१६: कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस उत्पादन शेतकरी घेतात व त्यांची आर्थिक उन्नती घडून येते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अशी नवतंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.                   कृषी उत्पन्न बाजार समिती व पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित ‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महामहोत्सव-कृषी पंढरी २०२४’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष  प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष गायकवाड, उपसभापती राजुबापु गावडे आदी उपस्थित होते. शेतकरी वर्गाच्या कल्याणाकरीता शासन प्रयत्नशील शेतकरी आपला मायबाप, अन्नदाता, लाखांचा पोशिंदा आहे, शेतकऱ्यांचे दु:ख व वेदना जाणून घेण्याबरोबरच त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत, या अंतर्गत मागील दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या  नुकसानीपोटी १५ हजार कोटी रूपयांची मदत देण्यात आली. मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण, ‘एक रुपयात पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत १२ हजार रुपये देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना वीज देयकात माफी, ठिंबक सिंचन, दुधाच्या अनुदानात पाच रुपयांची वाढ, बांबु लागवडीकरीता हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान, बेदाणाचा शालेय पोषण आहारात समावेश, दिवसा वीज देण्याचा निर्णय असे विविध लोककल्याणकारी योजनेच्यामाध्यातून सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्याला मदत करण्यात येत आहे. केंद्रशासनाच्या निगडीत प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासन मिळून काम करत आहे. या वर्षीचा महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला आहे. शासकीय योजनांच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहू नये- समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले विविध निर्णय, योजनांमुळे त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम होते, त्यामुळे सर्व सामान्यापर्यंत  या योजना पोहचविण्याचे काम प्रशासनाने अचूकपणे करावे; समाजातील सर्व घटकाला याचा लाभ देण्याबरोबरच एकही पात्र व्यक्ती या योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिले. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना राज्याच्या विकासाकरीता समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश करुन त्यांना लाभ देण्यात येत आहे. हे सरकार शेतकऱ्याचे, वारकऱ्यांचे कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि सर्व सामान्यांचे आहे. राज्यशासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’अंतर्गत महिलांना १ हजार ५०० याप्रमाणे वर्षाला १८ हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार असून  या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  युवकाच्या हाताला रोजगार देण्याचे काम सुरु युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे ६ हजार, ८ हजार आणि १० हजार दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. तरुणांना रोजगार तसेच उद्योजकाला कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे श्री. शिंदे म्हणाले.       यावेळी माजी आमदार श्री. परिचारक यांनी आपले मनोगत व्यकत केले.       …

    Read More »
  • सुमित्रा पतसंस्थेच्या चेक बाऊन्स प्रकरणात माळशिरस न्यायालयाचा मोठा निर्णय ; आरोपीस 5 महिने शिक्षा व 10 लाख रु.दंड.

    महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात  अकलूज : खोटे चेक देऊन फसवणुकीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केलेल्या कायद्याला आज माळशिरस मध्ये…

    Read More »
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रामचंद्र मस्के यांची निवड

    महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात  अकलूज : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी उंदरगाव तालुका माढा येथील नेते रामचंद्र (काका)…

    Read More »
  • वारी दरम्यान 1 लाख 9 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी ; दोन महिला ताब्यात, अवैध ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल

    महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात  अकलूज : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान अकलूज पोलिसात तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आले…

    Read More »
  • पालखी मार्गस्थ होताच अकलूज नगरपरिषदेमार्फत गाव चकाचक ; 180 कर्मचार्‍यांनी केली 17 टन कचर्‍याची सफाई

    महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात अकलूज : पालखी मार्गावरील कोणत्याही गावातून पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छतेची खूप मोठी समस्या निर्माण…

    Read More »
  • जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन ; नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला

    महर्षि डिजीटल न्यूज  अकलूज :  चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी…

    Read More »
  • शिक्षण प्रसारक मंडळ करणार ३० हजार भाकरीचे वाटप ; वारकऱ्यांना अन्नदान, ११ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

    महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात अकलूज :  येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतून  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!