Latest News

अतिवृष्टीच्या इशारा अकलूजमध्ये ओढ्यांचे खोलीकरण व स्वच्छता मोहिमेला सुरूवात : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा पुढाकार

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

अकलूज : आभाळ फाटून पाऊस कोसळण्याच्या शक्यतेने अकलूजकरांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. विदर्भ हवामान खात्याने परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी नगरपरिषदेत तातडीची बैठक बोलावून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जलदगतीने उपाययोजना करण्याचा निर्धार केला.

बैठकीत झालेल्या चर्चेत ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांचे प्राण व संपत्ती सुरक्षित राहावीत, यासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी नगरपरिषदेला तातडीने काम सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

त्या सूचनांनुसार आज गांधी चौक, 1070 झोपडपट्टी, नायर झोपडपट्टी, विकासनगर ते निरा नदीपर्यंत जाणारा ओढा तसेच व्यंकटनगर परिसरातील मोठी गटारे याठिकाणी खोलीकरण व स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मोठ्या यंत्रसामग्रीसोबतच नगरपरिषद कर्मचारी रात्रंदिवस श्रम करत आहेत.

या उपक्रमाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून शहराला पूराच्या संकटातून वाचवण्यासाठी प्रशासन, जनप्रतिनिधी व नागरिक असे सर्वजण एकदिलाने उभे राहत असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे.

“वेळेवर केलेली तयारीच खरी सुरक्षितता असते,” हे अधोरेखित करत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नागरिकांना दिलासा दिला. तर माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी, “अकलूजकरांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड होणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

या मोहिमेमुळे पावसाळ्यातील भीतीचे सावट मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, नागरिकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि समाधानाचे हास्य फुलले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!