शहर

मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम ; अकलूजमधील “श्रीनाथ आर्ट्स डिजिटल”कडून मुलीच्या पहिल्या वाढदिवसासाठी फ्लेक्स बॅनर मोफत

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार वाढावा आणि “मुलगी हीच घराची शान” हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने अकलूज येथील श्रीनाथ आर्ट्स डिजिटल या फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसायाने एक अभिनव सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत माळशिरस तालुक्यातील मुलींच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त लावण्यात येणारा फ्लेक्स बॅनर पूर्णपणे मोफत छापून देण्यात येणार आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळण्यासोबतच समाजात सकारात्मक संदेशही दिला जाणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

अमित गदादे यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, “समाजात मुलींबाबत आदर आणि अभिमानाची भावना वाढावी, तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत आनंदाने व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनेक कुटुंबे फ्लेक्स लावतात. त्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

तसेच या योजनेचा लाभ माळशिरस तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!