अकलूज शहरात ४ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ; दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : अकलूज शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. रेश्माताई आडगळे व उपनगराध्यक्ष तथा गटनेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील आणि क्रांतिसिंह माने-पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकलूज नगरपरिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या विकासकामांमध्ये शहरातील विविध भागांतील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे, समाजमंदिरांची उभारणी आणि विद्युतीकरण अशा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील लक्ष्मीनारायण नगर येथे ३० लाख रुपये खर्चून रस्ता करण्यात येणार असून, पाटीदार भवनच्या पाठीमागे १० लाख रुपये खर्चून रस्ता विकसित करण्यात येणार आहे. याच प्रभागातील नवीन बाजारतळ येथे अजित वडे ते आशारफ बागवान तसेच सिद्ध हॉस्पिटल ते संतोष वाघमोडे यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यात येणार असून, त्यासाठी १६ लाख ७५ हजार ११३ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच १०७० झोपडपट्टी, सरदार तांबोळी, लक्ष्मीनगर ५ येथे रस्ता व गटार बांधण्यासाठी ९ लाख ८५ हजार ८२५ रुपये, तर योगेश गांधी ते महावीर मेडिकल आणि गांधी चौक ओढ्यापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठीही ९ लाख ८५ हजार ८२५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मधील सुरज लोंढे, विकी लोंढे ते राकले ते भक्ती मार्ग या परिसरात गटार बांधण्यासाठी ९ लाख ९२ हजार २३० रुपये, पटेल ते विजय मोटर्सपर्यंत रस्ता करण्यासाठी ४ लाख ९९ हजार ९५७ रुपये, तर महर्षी कॉलनी येथे समाजमंदिर उभारण्यासाठी ३५ लाख २७ हजार ६४३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधील जयशंकर उद्यान ते शॉपिंग सेंटरपर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी २४ लाख ५४ हजार ७२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक २ मधील रामायण चौक ते अक्कलूचा राजा परिसरापर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी २६ लाख ५६ हजार १९८ रुपये, तर शनिमंदिरालगतच्या वसाहतीमध्ये बंदिस्त गटार बांधण्यासाठी ४ लाख ९९ हजार ५६३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधील अक्कलू लिंगे यांच्या भंगार दुकानामागे रामबाग ६ येथून स्नेहल खंडागळे यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी ४९ लाख ९७ हजार ४६३ रुपये, समतानगर व रामबाग परिसरात विद्युतीकरणासाठी ५३ लाख ७३ हजार १११ रुपये, तर हनुमाननगर परिसरात अंतर्गत बंदिस्त गटार बांधण्यासाठी ९ लाख ९९ हजार ८०६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

प्रभाग क्रमांक १० मधील ब्लड बँकेच्या पाठीमागून पांडे गोडाऊनपर्यंत गटार बांधण्यासाठी २९ लाख ४५ हजार ५१२ रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील ताम्हाणे कॉम्प्लेक्स ते शिवशंकर बाजारपर्यंत बंदिस्त गटार बांधण्यासाठी ४९ लाख ९८ हजार ०८० रुपये, तर क्रांतिसिंह इंदिरा घरकुल येथील मुख्य रस्ता करण्यासाठी ३९ लाख २६ हजार ९२५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील सुजयनगर १३ येथे रस्ता करण्यासाठी २४ लाख २ हजार २६३ रुपये आणि सुजयनगर ६ येथे रस्ता करण्यासाठी २० लाख २९ हजार ८८८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये एकाच वेळी रस्ते, गटारे, विद्युतीकरण आणि समाजमंदिरांची कामे हाती घेतल्याने अकलूजच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. या कामांमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर उपाययोजना होण्यास मदत होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला सर्व प्रभागांतील नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



