अकलूजमध्ये शिवसेनेचा पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी ओबीसी प्रदेशाध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारा पक्षप्रवेश सोहळा अकलूज येथे पार पडला. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत शिवबंधन बांधले. अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते आमदार शहाजीबापू पाटील, सोलापूर जिल्हा निरीक्षक आमदार संजय कदम तसेच माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवसेना ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भिमराव भुसनर पाटील, प्रदेश संघटक प्रमुख तानाजीभाऊ साठे, खंडकरी शेतकरी संघटना माळशिरस तालुका प्रमुख तानाजी भोळे पाटील, सोलापूर जिल्हा माजी उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, शिवसेना वैद्यकीय सेवा सोलापूर जिल्हा उपप्रमुख बापू क्षीरसागर, पैलवान सादिक पठाण, शहाजी काळे, शिवसेना ओबीसी माळशिरस तालुका प्रमुख विक्रम काशीद, पिठू यादव, सौ. निताताई शिंदे तसेच माळशिरस तालुका माजी महिला प्रमुख सौ. रोहिणीताई लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात माळशिरस तालुका ओबीसी युवक आघाडीचे तालुका प्रमुख हरिविजय साठे यांच्यासह संतोष खुडे, सुजित निकम, तेजस म्हेत्रे, सुरेश नलावडे, स्वप्नील कुदळे, रितेश सावंत, मनिष ननावरे, महादेव बाबर, आशुतोष मुंडे, रोहित साठे, सुमित साळुंखे, अभिषेक बोरावके, पवन सांगळे, सोमनाथ फुले, लहुराज धनवडे, शुभम जगताप, व्यंकटेश देवकर, ऋषभ खुडे, युवराज गोडसे, शंतनू सगर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस म्हेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल पवार यांनी मानले. या पक्षप्रवेशामुळे माळशिरस तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



