किरण घाडगे (माने) यांचा गौरव; माळशिरस पंचायत समितीकडून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

महर्षि डिजिटल न्यूज | सागर खरात
माळशिरस : पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. प्राथमिक शाळा, वेळापूर (मुलींची शाळा) येथील शिक्षिका सौ. किरण हनुमंत घाडगे (माने) यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार आमदार उत्तमराव जानकर साहेब, पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर तसेच शिक्षणाधिकारी सौ. सुषमा महामुनी मॅडम यांच्या हस्ते सौ. घाडगे यांनी स्वीकारला.
शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेले उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची बांधिलकी आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
श्रीमती घाडगे यांच्या या यशामुळे वेळापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



