शहर

आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी; २ हजारांहून अधिक शिवभक्तांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

नातेपुते : चैत्र वारी निमित्त शिखर शिंगणापूर येथे सुरू असलेल्या कावड यात्रेदरम्यान शिवभक्तांसाठी उभारलेल्या आरोग्य सेवेचा मोठा लाभ होत असून, आतापर्यंत २ हजारांहून अधिक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, राजकुमार हिवरकर पाटील (शिवसेना जिल्हाप्रमुख, ओबीसी) यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” उपक्रमांतर्गत आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत.

नातेपुते येथील शंभू महादेव मंदिरासमोर उभारलेल्या दवाखान्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. मराठवाडा, विदर्भ तसेच कर्नाटकातून हजारो शिवभक्त पायी, अनेकदा अनवाणी चालत यात्रेत सहभागी होत असल्याने त्यांच्या पायांना जखमा होणे, भेगा पडणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाविकांना त्वरित उपचार, औषधे व वैद्यकीय मदत या केंद्रांमधून मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत रक्तदाब तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच इलेक्ट्रॉल पावडरचे वितरण करण्यात आले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

या आरोग्य सेवेच्या अंमलबजावणीत डॉ. शिवाजी शेंडगे (वैद्यकीय अधिकारी), साधना दोलताडे (औषध निर्माण अधिकारी), चिऊताई पाखरे (परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवे), डॉ. सावंत एस. बी. (वैद्यकीय अधिकारी), धाईंजे ए. बी., गुजरे एस. आर. (आरोग्य सहाय्यक), डॉ. खोकले (सीएचओ), निलोफर मुलाणी, मंगल सूळ, मंगल काळे (आरोग्य सेविका), तसेच जाधव एस. एस., नलावडे एस. पी., तोडकर एस. एन. (आरोग्य सेवक) यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी गणेश प्रतिष्ठानचे दादा अटक, अक्षय ठेंगल, निखिल पद्मन, दत्ता बोडरे, तुषार मिटकरी आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे यात्रेतील शिवभक्तांना मोठा दिलासा मिळत असून, “आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!