Latest News

सोन्याची खरेदी, पैठणीची भेट अन् कार जिंकण्याची संधी; अकलूजच्या ‘बी. एस. धनलक्ष्मी ज्वेलर्स’चा ‘दिवाळी ट्रिपल महाधमाका’!

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून अकलूज येथील प्रसिद्ध सुवर्ण दालन ‘बी. एस. धनलक्ष्मी ज्वेलर्स’ने ग्राहकांसाठी ‘धनलक्ष्मी दिवाळी ट्रिपल महाधमाका’ ही भव्य योजना जाहीर केली आहे. येत्या १८ ऑक्टोबर ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष ऑफर सुरू राहणार असून ग्राहकांना सुवर्णखरेदीवर आकर्षक सवलतींसह बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याची माहिती बाबुशेठ चव्हाण पाटील यांनी दिली.

या योजनेअंतर्गत ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर (घडणावळ) विशेष सवलत दिली जात असून घडणावळ केवळ ६.९९ टक्क्यांपासून सुरू होणार आहे. याशिवाय, ७५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर ग्राहकांना मानाची येवला पैठणी साडी मोफत भेट दिली जाणार आहे.

उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दालनातर्फे एका भव्य ‘लकी ड्रॉ’चेही आयोजन करण्यात आले आहे. या लकी ड्रॉमध्ये सहभागी होणाऱ्या भाग्यवान ग्राहकांना अल्टो कार, रॉयल एनफिल्ड बुलेट आणि ज्युपिटर स्कूटी यांसारखी आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत.

महर्षी चौक, अकलूज येथील बी. एस. धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या दालनात ही योजना मर्यादित कालावधीसाठी लागू असून या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्व अटी व नियम लागू राहतील, अशी माहिती व्यवस्थापनातर्फे देण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही दालनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button