Latest News

अकलूज मध्ये विकास कामांचा धडाका ; तब्बल 9 कोटी 30 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन 

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

अकलूज : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रभाग क्र. 12 आणि प्रभाग क्र. 11 मधील एकूण ₹9 कोटी 30 लाखांच्या सिमेंट काँक्रिट रस्ता व गटर बांधकामांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, स्वाती फुले, शितल बनपट्टे, नाशिक सोनवणे तसेच लालासाहेब अडगळे, लखन गायकवाड, राजेंद्र फुले, डॉ. एकतपुरे, डॉ. शेटे, डॉ. सूर्यवंशी यांच्यासह दोन्ही प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्र. 12 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल ते सुजयनगर 14 पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व गटर बांधकामासाठी ₹5 कोटी 58 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामास आज सुरुवात झाली.

तसेच प्रभाग क्र. 11 मध्ये हॉटेल व्हेज ट्रीट ते ताम्हाणे कॉम्प्लेक्सपर्यंत सिमेंट रस्ता व गटर बांधकामासाठी ₹3 कोटी 72 लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असून या कामाचाही शुभारंभ करण्यात आला.

या विकासकामांमुळे नागरिकांना दर्जेदार रस्ते, सुलभ वाहतूक आणि सुधारित स्वच्छता सुविधा मिळणार आहेत. परिणामी परिसराच्या विकासाला अधिक वेग मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अकलूज शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून, अशा पायाभूत सुविधांच्या कामांमुळे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!