पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरवली येथे “पांडुरंग व्यसनमुक्ती केंद्र” चे भव्य उद्घाटन

महर्षि डिजीटल न्यूज
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरवली येथे “पांडुरंग व्यसनमुक्ती केंद्र” या नव्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे भव्य उद्घाटन माननीय सविता संजय नवगिरे (जिल्हाध्यक्ष) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी माननीय सुजय सुनीलराव गोडसे पाटील (माजी ग्रामपंचायत सदस्य, यशवंतनगर), डॉ. उदयसिंह टी. पवार, तसेच केंद्राचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे आणि उपाध्यक्ष संतोष पांडुरंग कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज बाळासाहेब गोडसे पाटील, योगेश गोडसे पाटील, नवनाथ अवताडे, दत्ता सुरवशे, सावता कांबळे, दत्ता कांबळे, अनिल कांबळे, संजय ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित राहून व्यसनमुक्तीच्या या समाजसेवी कार्याचे कौतुक केले.
या केंद्रात व्यसनाधीन व्यक्तींना नवजीवन देण्यासाठी योगा, मेडिटेशन, वैयक्तिक व गट काऊन्सिलिंग, औषधोपचार, तसेच निसर्गरम्य वातावरणातील निवास व पौष्टिक आहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रात रुग्णांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक पुनर्वसनावर विशेष भर दिला जाणार असून, प्रत्येक व्यक्तीला व्यसनमुक्त जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी सर्वांगीण सहाय्य पुरवले जाणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. अनिल काळे म्हणाले, “समाजात व्यसनमुक्ततेबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. या केंद्राच्या माध्यमातून आम्ही अनेकांना नव्या आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न करू.”
समाजाच्या पुनर्वसनासाठी आणि व्यसनमुक्ततेसाठी एक प्रेरणादायी पाऊल म्हणून “पांडुरंग व्यसनमुक्ती केंद्र, वाडी कुरवली” हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणार आहे.



