आ.उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत माळशिरस तालुक्यात होणार भव्य लोकअडचणी निवारण आमसभा

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्याचे कार्यतत्पर, जनतेच्या हक्कांसाठी लढणारे, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांचे खंबीर नेतृत्व असलेले आमदार उत्तमराव जानकर यांच्या पुढाकारातून आणि अध्यक्षतेखाली एक ऐतिहासिक व लोकाभिमुख लोकअडचणी निवारण आमसभा बुधवार, दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता, अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा येथे होणार आहे.
या सभेस विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, तसेच तालुक्यातील सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शासकीय सेवा व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तमराव जानकर यांनी राबवलेला हा उपक्रम लोकशाहीतील उत्तरदायित्व आणि संवेदनशीलतेचे प्रतीक मानला जात आहे.
या आमसभेच्या निमित्ताने उत्तमराव जानकर यांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीची प्रचीती घडवली आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, जेष्ठ नागरिक, महिला, अपंग, कामगार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी आणण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. त्यांच्या नेतृत्वात आयोजित होणारी ही सभा म्हणजे जनतेच्या दारात प्रशासन पोहोचवण्याचे ज्वलंत उदाहरण ठरणार आहे.
या आमसभेत नागरिकांच्या समस्या जसे की – शेतीविषयक अडचणी, शासकीय योजनांचे लाभ, जमीन मोजणी, उत्पन्न प्रमाणपत्रे, अपंग सवलती, महिला बचत गटांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, पाणी व वीजपुरवठा यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींचे तुरंत निवारण केले जाणार आहे.
“लोकांच्या प्रश्नांना झोपेतून उठूनही उत्तर देण्याची तयारी ठेवणारे” असे जनतेत नाव मिळवलेले आमदार जानकर हे आज माळशिरस तालुक्याच्या आशेचे अधिष्ठान ठरले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की खरे लोकनेतृत्व हे फक्त निवडणुकांपुरते नसून, जनतेच्या प्रत्येक वेदनेत सहभागी होणारे असते.
तरी सर्व नागरिकांनी आपल्या अडचणींसह आवश्यक कागदपत्रे घेऊन या ऐतिहासिक आमसभेस उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तमराव जानकर व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.