उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे जागतिक नर्सेस दिन उत्साहात साजरा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे जागतिक नर्सेस दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुडे यांच्या नेतृत्वात आणि डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या विशेष सहभागातून हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रद्धा जवंजाळ मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत IMA अकलूजचे अध्यक्ष डॉ. संजय सिद, देवडीकर हॉस्पिटलच्या संस्थापिका वसुंधरा देवडीकर, थोरात सर हे मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. रुग्णालयातील सर्व अधिकारी, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचारी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमात डॉ. स्मिता शिंदे यांनी खास नर्सेसच्या कार्याचे गौरव करणारी कविता सादर केली. प्रमुख पाहुण्या डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी सहारा नर्सिंग कॉलेजच्यावतीने अकलूज येथील नर्सेस टीमच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला. यानंतर फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन व शपथविधी पार पडला. सर्व नर्सेसनी केक कापून नर्सेस दिनाचा आनंद साजरा केला.
यावेळी सेवानिवृत्त केदारी सिस्टर आणि भांबुरे सिस्टर यांचा फुलाच्या रोपटीने सत्कार करण्यात आला. तसेच सर्व नर्सेस व सहारा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. स्मिता शिंदे, डॉ. लवटे, डॉ. नेरे यांच्यासह सर्व नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. एकात्मिकतेने साजरा झालेला हा दिवस नर्सिंग व्यवसायातील समर्पण आणि सेवा भावनेचा सन्मान करणारा ठरला.