अकलूज माळेवाडी येथील सहारा इन्स्टिट्यूट येथे उद्या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन : मानवसेवेचा आदर्श उपक्रम

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक गुरूदेव सद्गुरू श्री श्री रवीशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून अकलूजमध्ये मंगळवार, दिनांक १३ मे २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत सहारा इन्स्टिट्यूट हॉल, माळेवाडी कॉलेज रोड, अकलूज येथे होणार आहे.
या शिबीराचे आयोजन पोलीस स्टेशन अकलूज, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अकलूज, सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँक अकलूज आणि पिंक रेवोल्युशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत: प्रा. धनंजय देशमुख – ९२६०७१०७१०,
श्री. माऊली मुंडफणे – ९९२२१४०१०५,
श्री. विश्वास साळोखे (माजी पोलीस अधिकारी) – ९८२३३३६७६७,
श्री. श्रीयश चांडोले – ७७४३८९३५६३ (सहारा इन्स्टिट्यूट, अकलूज).
हा उपक्रम अकलूजमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता वाढवण्यास मदत ठरणार असून, समाजसेवेचा एक उत्कृष्ट नमुना ठरणार आहे.