बच्चू कडू यांच्या आंदोलनात गोरख जानकर यांचा सहभाग ; पाचाड रायगड येथे प्रहारचे अन्नत्याग आंदोलन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी पाचाड रायगड येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात राज्यभरातील दिव्यांग, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगांचे नेते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील तसेच दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनीही या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या वतीने आपण बच्चू कडू यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडवाव्यात, त्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी प्रहार पक्षाने लढा उभारला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन पुढील काही दिवस सुरू राहणार असून, यात महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.