मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते प्रकाशन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : सालाबाद प्रमाणे मराठा सेवा संघाच्या वतीने प्रकाशित होणार्या शिवधर्म या दिनदर्शिकेचे प्रकाशन अकलूजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, मराठा सेवा संघाचे इंजिनिअर उत्तमराव माने, प्रशासन अधिकारी महेंद्र बुगड, रविंद्र पवार, मराठा सेवा संघ विभागीय सचिव वनिता कोरटकर, मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष हेमलता मुळीक, राजेंद्र मिसाळ, बाळासाहेब पराडे, बाळासाहेब पवार, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष मनोरमा लावंड, नवनाथ नागणे, नवनाथ जाधव, वीर साहेब, शिवाजीराव लोंढे, शारदा चव्हाण, शुभांगी क्षिरसागर, रहीम मुलाणी, विठ्ठल कोडग व सेवा निवृत्त कषि अधिकारी सिध्देश्वर नागटिळक, निलेश चव्हाण, कृष्णा लावंड यांच्यासह सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात उत्तमराव माने शेंडगे यांनी दर वर्षी शिवधर्म या दिनदर्शिकेचे प्रकाशन तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते करण्यात येते. या वर्षी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यांचा फोटो दिनदर्शिकेचे पहिल्या पानावर असून प्रत्येक पानावर त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आहे. तसेच सदर दिनदर्शिकेत सर्व महापुरुष यांचे कार्य त्यांचे जन्मदिनांक त स्मृतीदीन यांची पण माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मराठा सेवा संघा मार्फत राबविण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती सांगितली.
प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सेवा संघाच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या वतीने राबवित असलेल्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या तसेच कुणबी दाखल्याबाबत व समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेवटी उपस्थितांचे आभार वनिता कोरटकर यांनी मानले.