युनिक ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राजु कदम यांचा सत्कार
महर्षि डिजीटल न्यूज
पुणे : युनिक ग्रुप कात्रज या नुकत्याच उदयास आलेल्या सामाजिक संस्थेने विविध मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या सत्कार समारंभात कात्रज परिसरातील सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे, परीसरातील लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते आदी समस्या सोडविण्यासाठी धडपड करणारे कात्रज चे थोर सामाजिक कार्यकर्ते राजु कदम यांचा सत्कार युनिक ग्रुप,कात्रज च्या वतीने शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तसेच युनिक ग्रुपच्या वतीने अबॅकस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या शिक्षिका सौ शीतल प्रशांत धाडवे, पीएमपीएमएलच्या सत्तावीस वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झालेले चंद्रकांत भोले, आणि एस.आर. पी.एफ,पुणे येथे नुकतेच नियुक्त झालेल्या सौरभ कंक यांचाही शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन थोर सामाजिक कार्यकर्ते राजु कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
थोर सामाजिक कार्यकर्ते राजु कदम यांनी युनिक ग्रुप, कात्रज या सामाजिक संस्थेचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रशांत भोसले यांनी केले.
या कार्यक्रमाला युनिक ग्रुप मधील प्रशांत भोसले, संतोष घारे, प्रमोद शिनगारे, संदीप वरे, दिपक गोतरणे, विक्रम जाधव, विनोद साठे, सचिव मोरे, गजानन कोष्टी, सुहास आदवडे, सागर भोंडवे, उपस्थित होते.