अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई ; दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त
महर्षि डिजीटल न्यूज
पंढरपूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक अप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दि. 19 डिसेंबर 2024 रोजी गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक अप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असून, सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत.
या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, राजेंद्र वाघमारे, पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगडाळे , पियुष भोसले , प्रमोद खंडागळे , महेश सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे,समीर पटेल,मंगेश बनसोडे ,रविकिरण लोखंडे, पी. पी. कोईगडे,आर बी खंदारे व पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी होते.