आरोग्य सेविकेची आशा सेविकांना शिवीगाळ ; शंकरनगर येथील घटनेची अकलूज पोलिसात तक्रार
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शंकरनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कामा संबधी निवेदन देण्यासाठी गेलेल्या आशा सेविकांना तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य सेविकेने विनाकारण शिवीगाळ केल्याची तक्रार अकलूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
लाल बावटा आशा वर्कर्स युनियन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा तथा शंकरनगर प्रथामिक आरोग्य केंद्र याठिकाणी आशा सेविका म्हणून काम करीत असलेल्या रुपाली दोरकर या सकाळी 11 वा.चे सुमारास वैद्यकीय अधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्या ठिकाणी महाळुंग येथे कार्यरत असलेल्या शमा पठाण -जगताप आल्या. विनाकारण शिवीगाळ करीत अपशब्द वापरून सभासद व संघटना यांच्याबाबत चुकीचे शब्द वापरून संघटनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विनाकारण शिविगाळ करु नका म्हणल्यावर आपणास मारण्याची धमकी ही दिल्याची फिर्याद रुपाली दोरकर यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी गु.र.नं 1617/2024 BNS कलम 352.351(2)351 (3)अन्वये आरोपी विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आशा सेविका व संघटनेच्या इतर सेविकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही प्रत्यक्ष भेटुन झालेला प्रकार सांगितला.
यावेळी लाल बावटा आशा व गट प्रवर्तक युनियन लाल बावटा सोलापूर संघटनेच्या राज्य महासचिव काॅ.पुष्पा पाटील व जिल्हा कोषाध्यक्ष काॅ.सिध्दाराम उमराणी व सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्ष व तालुक्यातील ईतर आशाताई उपस्थित होत्या.