अन्यथा कर्मचारी संघटना करणार बेमुदत काम बंद आंदोलन
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनांनी आज आक्रमक पवित्रा घेत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दि.12/12/2024 रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला व संबंधित आरोपींना 24 तासांचे आत अटक न झालेस उद्या दि.17/12/2024 पासून ते अटक होईपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन करणार असलेबाबतचे निवेदन माळशिरसचे तहसिलदार, तसेच वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, शाखा माळशिरस यांचेवतीने देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्न विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती अधिनस्त कार्यरत सर्व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढील काळात असे प्रकार कदापि खपवुन घेतल्या जाणार नाहीत याची सर्व समाजकंटकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला.