अकलूज येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेह मेळावा ; सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी आणि हास्य विनोदाने आणली रंगत
महर्षि डिजीटल न्यूज /सागर खरात
अकलूज: येथील मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात ग्रुपमधील सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्नेह मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, गाणी, आणि हास्यविनोदांनी रंगत भरली. सदस्यांमध्ये एकोपा आणि मैत्री अधिक दृढ करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला सर्व स्तरांवरून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या युगात माणसाला जगण्यासाठी अविरतपणे धावपळ अन धडपड करावी लागते त्यामुळे हल्ली माणसाची नुसती घुसमट होतीय. अशा अस्वस्थ माणसाला क्षणभरासाठी का होईना पण सुखावून टाकणारी, समाधान देणारीच नव्हे तर पुढील जगण्याची उर्जा ठरणारी गोष्ट म्हणजे जिवाभावाच्या माणसांची स्नेहभेट होय, शारिरीक मानसीक स्वास्थ्य राखण्याकरीता व्यायाम व योगाची अपरीहार्यता ओळखून डॉक्टर, पोलीस, वकील, शेती, शिक्षण, विमा, उदयोग, बँकींग, मेडीकल आदी क्षेत्रातील मंडळी रोज सकाळी विजयसिंह मोहिते पाटील क्रिडा संकुल अकलुज येथे नियमीतपणे येवू लागली व त्यातूनच पुढे सन २०१६ मध्ये मॉर्नंग ग्रुप अकलुजवी निर्मीती झाली.
माणसाच्या स्वास्थ्याकरीता योग व व्यायामासोबतच गाठीभेटीही तितक्याच महत्वाच्या असतात याच संकल्पनेतून ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी या गीताप्रमाणे मॉनींग ग्रुप अकलुज यांनी सुमारे चार वर्षापासून सुरु केलेला सहकुटुंब वार्षीक स्नेहसंमेलनाचा सोहळा याही वर्षी मोठया उत्साहात दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल चेहिता गार्डन अकलुज येथे संपन्न झाला.
मोठया संख्येने व उत्साहात सहभागी झालेल्या महिला भगिंनीच्या हस्ते शिवप्रतीमेचे पुजन व द्विपप्रज्वलन होवून सौ वनिता कोरटकर यांच्या शिववंदनेने सोहळयास सुरुवात झाली. यांनंतर समाधान देशमुख यांच्या प्रास्ताविकानंतर ग्रुपच्या सांस्कृतीक कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यामध्ये सौ सोनाली हरिश्चंद्र पाटील यांनी गायलेल्या सुमधूर गाण्यांनी सर्वांची मने जिंकली. त्याचबरोबर डॉ फारुख शेख समाधान देशमुख यांनी गायलेले गीत सर्वांच्या पसंतीस उतरले. त्याचबरोब ग्रप सदस्य श्री सुहास क्षिरसागर, श्री कांतीलाल एकतपुरे, डॉक्टर श्री सावंत पाटील यांनी गायलेल्या सदाबहार गाण्याने कार्यक्रमामध्ये रंगत वाढली. सौ अश्विनी शिंदे व त्यांची कन्या तसेच बादशहा शेख व त्यांची कन्या यांच्या नृत्याविष्काराने सर्वांना क्षणभर भावूक केले.
कार्यक्रमाच्या मध्यांतरास डॉ.शिरीष रणनवरे डॉ.सुनिल राउत व डॉ.फारुक शेख यांनी निरोगी आरोग्याचे महत्व पटवून देताना आयुर्वेद, होमोओपॅथी, अॅलोपॅथी यांचेतील फरक समजावून सांगीतला. तसेच श्री.शशिकांत निकम यांनी पर्यटनाचे महत्व व राज्याच्या विवीध भागातील लोकजिवन याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर कु काजल गायकवाड हिने मदन मंजीरी या लावणीवर केलेले नृत्य सर्वाना भावून गेले. तसेच डॉ.रणनवरे, डॉ.सावंत पाटील, पृथ्वीराज देशमुख यांनी विवीध विषयांवरील अर्थपूर्ण कवितांचे सादरीकरण केले. यानंतर सौ.वनिता कोरटकर यांनी नृत्याविष्कारासह सादर केलेल्या गाण्याने अंगावर शहारे आणले. शेवटी समाधान देशमुख व डॉ.फारुख शेख यांनी गायलेल्या कानडा राजा पंढरीचा या भक्तीगीताने वातावरण मंत्रमुगध झाले. अॅड. राहूल पवार यांनी केलेले नेटके सुत्रसंचलन व डॉ.शिरीष रणनवरे यांचे आभार प्रदर्शनानंतर पसायदान होवून स्नेहभोजनाचा आस्वाद घेत पुढील स्नेहभेटीच्या संकल्पासह कार्यक्रमाची सांगता झाली.